अवजड उद्योग मंत्रालय
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी भारतीय दुग्ध उद्योगांचा कायापालट करण्यासाठी "दुग्ध संकलन साथी मोबाईल अॅप" चे केले अनावरण
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2023 7:05PM by PIB Mumbai
उत्तराखंडच्या मसुरी येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी आज दुग्ध संकल्पन साथी मोबाईल अॅपचे अनावरण केले. जयपूर येथील राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड (आरइआयएल) या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील कंपनीने या अॅपची रचना केली असून ते विकसितही केले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी आरइआयएल ही मिनी रत्न कंपनी आहे. दूध संकलन प्रक्रियेतील आव्हाने दूर करून भारतीय डेअरी उद्योगांवर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यासाठी हे अॅप सज्ज आहे. या मोबाईल अॅपचा उद्देश दुधाची गुणवत्ता सुधारणे, संबंधितांमधे पारदर्शकता वाढवणे आणि दूध सहकारी संस्थांसह गावपातळीवरील कामकाज सुव्यवस्थित करणे हा आहे.
यावेळी डॉ.महेंद्र नाथ पांडे म्हणाले, “प्रक्रियेच्या डिजिटलीकरणासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता आणि दूध उत्पादकांना थेट लाभ हस्तांतरण करण्याच्या दिशेने या अॅपच्या माध्यमातून अवजड उद्योग मंत्रालयाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.”
दूध उत्पादक, दूध सहकारी संस्था, दूध संस्था आणि राज्य महासंघांचे कामकाज सुधारण्यासाठी हे अॅप्लिकेशन सक्रियपणे काम करेल, असे त्यांनी सांगितले. दूध संकलन मोबाइल अॅप दूध उत्पादकांना इंग्रजी, हिंदी, पंजाबी, तेलगू आणि इतर भाषांमध्ये सर्व सेवांची माहिती देईल.
***
S.Kakade/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932993)
आगंतुक पटल : 237