संरक्षण मंत्रालय
हवाई दलाच्या उप प्रमुखांनी बेंगळूरू येथील राष्ट्रीय विमानोड्डाण चाचणी केंद्र, वैमानिकी विकास संस्था आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड येथे भेटी दिल्या
Posted On:
15 JUN 2023 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2023
लढाऊ विमानांच्या स्वदेशी निर्मितीसाठी सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हवाई दलाचे उपप्रमुख (डीसीएएस) एअर मार्शल आशुतोष दिक्षित यांनी आज बेंगळूरू येथील राष्ट्रीय विमानोड्डाण चाचणी केंद्र, वैमानिकी विकास संस्था आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या तेजस विभागाला भेट दिली. विमानांची प्रायोगिक चाचणी घेण्यात स्वतः तरबेज असलेल्या एअर मार्शल आशुतोष दिक्षित यांनी लढाऊ विमानांचे विकसन आणि उत्पादन याबाबतीत स्वावलंबी होण्यासाठी भारतीय हवाई दलातर्फे ते आत्मनिर्भर भारत अभियान चालवीत आहेत. या भेटीदरम्यान, एअर मार्शल दिक्षित यांनी तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या सिरीज प्रोडक्शन ट्रेनर-01 या विमानाची हवाई चाचणी घेतली. या प्रकारच्या विमानांच्या क्षमतेचा प्रत्यक्ष अंदाज येण्यासाठी अंतिम विकासात्मक चाचणी उड्डाणे सुरु आहेत. भारतीय हवाई दलात सध्या एलसीए एमके 1 या प्रकारची विमाने चालवली जात असून एलसीए एमके 1ए या प्रकारच्या 83 विमानांची मागणी पूर्ण होणे बाकी आहे.
डीसीएएस एअर मार्शल दिक्षित यांनी तेजस विभागाला दिलेल्या भेटीदरम्यान एचएएलच्या पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षक विमानाची उत्पादनविषयक स्थिती तसेच एलसीए एमके 1ए विमानांच्या वितरण योजनेसंदर्भात माहिती दिली. डीसीएएस दिक्षित यांनी यावेळी प्रचंड या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या (एलसीएच) निर्मिती विभागाला भेट देऊन या स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरच्या उत्पादनाची सद्यस्थिती समजून घेतली. भारतीय हवाई दलाला आवश्यक असलेल्या 10 एलसीएच मर्यादित सिरीज प्रोडक्शन एअरक्राफ्ट चे वितरण लवकरच होणार असून भारतीय हवाई दल तसेच भारतीय लष्कराला हव्या असलेल्या 145 सिरीज प्रोडक्शन एलसीएचची मागणी पूर्ण करण्यासाठी सिरीज प्रोडक्शन एअरक्राफ्टचे उत्पादन लवकरच सुरु होणार आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932741)
Visitor Counter : 175