अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयाच्या गुरुग्राम अधिकार्‍यांनी उघडकीला आणले 863 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या 461 बनावट कंपन्यांचा समावेश असलेले आयटीसी रॅकेट

Posted On: 15 JUN 2023 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2023

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयाच्या  गुरुग्राम क्षेत्रीय विभागाने अलीकडे 461 बनावट कंपन्यांचा सहभाग असलेले एक मोठे फसवे आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. 863 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसी मंजुरीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन प्रमुख हस्तकांना अटक झाली आहे.

गैरव्यवहार करण्यासाठी गुप्त कार्यालयाविषयीची खबर गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर शोध घेण्यात आला तेव्हा या फसवणुकीचा छडा लागला. या कार्यालयात सापडलेल्या लॅपटॉपमध्ये भाडे करार, वीजबिल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या बनावट सॉफ्ट कॉपीज आढळून आल्या. या कार्यालयातून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, उपकरणे यांच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर कारवाई करण्यात आली. धातू/लोह आणि पोलाद क्षेत्रात जिथे मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी होते त्या क्षेत्रात हे बनावट आयटीसी पोहोचले आहे.

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1932739) Visitor Counter : 135


Read this release in: English , Urdu , Hindi