विशेष सेवा आणि लेख
हवामान-संबंधित धोरणांमध्ये सर्वसमावेशक, समान आणि न्याय्य लिंगसमानताकारक दृष्टीकोन असायला हवा - केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी
Posted On:
15 JUN 2023 9:48PM by PIB Mumbai
चेन्नई, 15 जून 2023
तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे 'महिला-प्रणित विकास- ट्रान्सफॉर्म, थ्राईव्ह आणि ट्रान्ससेंड' या संकल्पनेवर दोन दिवसीय महिला 20 (W20) शिखर परिषद आज केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या उपस्थितीत सुरू झाली. लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये तयार करण्यात आलेला W20 हा अधिकृत G20 प्रतिबद्धता गट आहे.
उदघाटन सत्रात प्रकाशित W20 जाहीरनाम्यात हवामान बदल, महिला उद्योजकता, लैंगिक डिजिटल तफावत , तळागाळातील महिला नेतृत्व, शिक्षण आणि कौशल्य विकास या 5 प्रमुख प्राधान्य क्षेत्रांमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली कृती करण्याचे आवाहन अधोरेखित करण्यात आले.
उद्घाटन सत्रात W20 च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी उद्घाटनपर भाषण केले. भारताच्या अध्यक्षतेखाली W20 ने हाती घेतलेले विविध उपक्रम त्यांनी अधोरेखित केले, ज्यात महिला प्रणित विकास, हवामान बदलासाठी प्रथम प्रतिसाद आराखडा , आरोग्य आणि वेतनातील तफावत यावर श्वेतपत्रिका आणि महिला उद्योजकता यांचा उल्लेख होता.
W20 जाहीरनामा मसुदा समितीच्या अध्यक्ष डॉ. शमिका रवी यांनी स्पष्ट केले की W20 निवेदन हे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेअंतर्गत महिला आणि मुलींना बदलाचे चालक म्हणून स्थान देण्याबाबत सर्व सदस्यांनी केलेले संयुक्त आवाहन आहे . महिलांच्या रोजगाराचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्याबाबत 2022 मधील बाली येथील नेत्यांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांना गती देण्याचे आवाहन यात केले आहे. महिलांसाठी समानता आणि लिंग-संवेदनशील आणि स्वतंत्र लिंग डेटा वापरून राष्ट्रीय लैंगिक धोरणे विकसित करण्याची घोषणा G20 नेत्यांच्या बाली जाहीरनाम्यात करण्यात आली होती.
भारतासाठी संयुक्त राष्ट्र निवासी समन्वयक डॉ. शॉम्बी शार्प यांनी देखील प्रतिनिधींना आणि उपस्थितांना संबोधित केले आणि जाहीरनाम्याबद्दल W20 चे अभिनंदन केले. भारताच्या G20 अध्यक्षपदाने भारताच्या पंतप्रधानांच्या 'सर्वसमावेशक, निर्णायक आणि कृतीभिमुख दृष्टीकोन खऱ्या अर्थाने साकारला आहे.असे त्यांनी अधोरेखित केले .
G20 शेर्पा अमिताभ कांत देखील या सत्राला उपस्थित होते. शेर्पा यांनी आपल्या विशेष भाषणात लिंग समानता आणि समता नजीकच्या काळात प्रत्यक्षात आणता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी आमूलाग्र बदल करण्याचे आवाहन केले. शेर्पा यांनी प्रगतीशील W20 जाहीरनाम्याची प्रशंसा केली ,ज्यात सर्व देशाच्या प्रतिनिधींच्या सहमतीने सर्व प्राधान्य क्षेत्रातील निर्णायक कृती-मुद्दे स्पष्टपणे यात मांडले आहेत.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी, महाबलीपुरम हे W20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी योग्य शहर आहे असे सांगत केवळ ऐतिहासिक भव्यतेसाठीच नव्हे तर सक्षम महिलांशी असलेल्या त्याच्या संबंधासाठी देखील प्रसिद्ध आहे असा गौरव करत आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात केली. भारतातील सर्वात परिवर्तनशील तत्त्वज्ञानांपैकी एक त्यांनी उद्धृत केले , तिरुक्कुरा या एका उत्कृष्ट तमिळ साहित्यात याचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की " विनाश टाळण्यासाठी विवेकबुद्धी हे एक शस्त्र आहे, ती एक कणखर शक्ती आहे जी शत्रू नष्ट करू शकत नाही."
डब्ल्यू 20 च्या महत्त्वाकांक्षी परंतु साध्य करता येण्याजोग्या ठरावाबद्दल स्मृती इराणी यांनी गौरवोद्गार काढले. सर्व प्राधान्य क्षेत्रांसाठीच्या शिफारशींची त्यांनी प्रशंसा केली. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली हवामान संवेदनक्षम कृतीत महिलांच्या भूमिकेचा पुनरूच्चार त्यांनी केला. हवामान बदल आण लिंगनिहाय परिणाम एकमेकांशी अविभाज्यपणे जोडले गेले आहेत. हवामान बदलामुळे महिला आणि मुलांना सगळ्यात अधिक धोका असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या 2018 च्या अहवालात म्हटलं आहे. हवामान बदलामुळे 80% महिला विस्थापित झाल्या आहेत, त्यामुळे महिला हवामान न्यायाचा गाभा असले पाहिजे असे त्या म्हणाल्या. हवामानीशी निगडित सर्व धोरणांचा दृष्टिकोन हा समावेशक, समान आणि न्याय्य असलाच पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..
डिजिटल लैंगिक समानता हा भारताच्या अध्यक्षतेखालील आणखी एक महत्त्वाचा पैलू असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल लैंगिक समानतेसाठी फक्त डिजिटल प्रशिक्षण उपलब्ध करून चालणार नाही तर तंत्रत्रान आणि तंत्रज्ञान उत्पादनांचा वापर करताना जन्मापासून केला गेलेला लिंगभेद दूर करण्यावर भर दिला गेला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
कोडेड तंत्रज्ञान आणि तांत्रिक उत्पादनांमधील लिंग-पूर्वाग्रह यावर डब्ल्यू 20 मंचाने चर्चा केली पाहिजे त्यामुळे तंत्रज्ञाना उपलब्धतेतील अडथळे दूर करता येतील, असे त्या म्हणाल्या. लैंगिक दृष्टीकोनातून कृत्रिम बुद्धिमत्तेची एक संधी या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील महिलांना काय देते यावरही तंत्रज्ञानावरील चर्चेने भर दिला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा एक भाग म्हणून, काळजी सेवांवर लक्ष केंद्रित केल्याने 300 दशलक्ष अतिरिक्त नोकर्या निर्माण होतील, त्यातील 80% पेक्षा जास्त महिला करतील. असे त्या म्हणाल्या. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या उद्दिष्टासाठी भारताचे अध्यक्षपद वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी भाषणाचा समारोप करताना केला.
डब्ल्यू 20 च्या शिखर परिषदेत मुख्य संकल्पनेवर आधारित विविध चर्चासत्रे होतील. याशिवाय या परिषदेत तमिळनाडूचा ग्रामीण विकास विभाग, तमिळनाडूच्या तळागाळातील उद्योजकांच्या प्रदर्शनाचा समावेश असेल. डब्ल्यू 20 अर्जेंटिना आणि डब्ल्यू 20 इंडोनेशियाच्या महिला उद्योजकांना त्यांचे कौशल्य आणि सर्जनशीलता दाखवण्यासाठी हे प्रदर्शन एक व्यासपीठ उपलब्ध करेल.
या विचारमंथनाद्वारे डब्ल्यू 20 शिखर परिषदेत लिंग-संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि जी 20 देशांमध्ये एक सहयोगी दृष्टीकोन तयार करण्यासाठी एक ठोस धोरण विकसित करण्याचा मार्ग मोकळा करणे अपेक्षित आहे.
S.Patil/Sushama/Prajna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932735)
Visitor Counter : 129