गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफएस) तसेच राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) यांतील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिराचे आयोजन


कायदा आणि सुव्यवस्था तसेच जिल्हा प्रशासन यांतील समन्वयानेच देशाच्या सीमांची सुरक्षितता सुनिश्चित करता येऊ शकेल - गृहमंत्री

सीएपीएफएस मधील जवानांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत वितरण करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश

Posted On: 12 JUN 2023 10:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2023

केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफएस) तसेच राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) या विभागातील  भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय गृह व्यवहार राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तसेच केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर विभागाचे संचालक निशीथ प्रामाणिक यांच्यासह केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या चिंतन  शिबिरात भाग घेतला. 

या शिबिरात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी जवानांचे कल्याण, क्रीडा क्षेत्राबाबत त्यांना प्रोत्साहित करणे तसेच जवानांच्या कुटुंबांविषयी  संवेदनशील दृष्टीकोन बाळगणे यावर अधिक भर दिला. सर्व सीएपीएफएस मधील जवानांनी राष्ट्रीय पातळीवरील क्रीडासंघ तयार करावेत असे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या जवानांनी दररोज किमान एक तास खेळांसाठी द्यायला हवा, त्यामुळे त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा तर होईलच पण त्याच बरोबर मातृभूमीशी असलेले त्यांचे नाते बळकट होईल.

केंद्रीय मंत्री म्हणाले कीमोदी सरकारची आयुष्मान सीएपीएफ ही योजना प्रत्येक जवानाला दीर्घ आणि निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी तयार केली असून ही योजना अधिक सुलभ करण्यासाठी सर्व सीएपीएफएसनी जवानांकडून सूचना मागवाव्यात. सर्व सीएपीएफ रुग्णालयांमध्ये सामान्य जनतेला मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यावेळी दिल्या.

प्रत्येक जवानाने आपल्या कुटुंबामध्‍ये  किमान 5 झाडे दत्तक घेतल्याने पर्यावरण स्वच्छ तर राहीलच शिवाय निसर्गाप्रती जवानांची संवेदनशीलताही वाढेल, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सीएपीएफच्‍या जवानांसाठी बांधलेल्या सर्व घरकुलांचे  या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत वितरण  करण्याचे, आणि भविष्यातील सर्व घरांचे वाटप ई-आवास पोर्टलद्वारे दोन महिन्यांत होईल, हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. शाह यांनी सीएपीएफ मध्ये सर्व साधारण नसलेली (नॉन- जनरल)   सेवा पदे भरण्याचे आणि भर्ती  प्रक्रियेतील सर्व प्रकारचे अडथळे एका महिन्याच्या आत दूर करण्याचे निर्देश दिले. जवानांमध्ये भरड धान्याची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या आहारात श्री अन्नाचा किमान 30 टक्के समावेश करण्याची गरज असल्याचे शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, हे चिंतन शिबीर, सर्व दलांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्‍यांसाठी त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी आणि आपल्या समोरील आव्हानांवर विचार करून भविष्यातील रणनीती तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

 

S.Bedekar/Rajashree/Sanjana/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931846) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri