कायदा आणि न्याय मंत्रालय
निवेदन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2023
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 224 च्या खंड (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करत, तीन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये (i) शैलेश प्रमोद ब्रह्मे, (ii) फिरदोश फिरोज पूनीवाला आणि (iii) जितेंद्र शांतीलाल जैन, या वकिलांचा समावेश आहे. ही नियुक्ती त्यांच्या ज्येष्ठतेनुसार, त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून, दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद वाटत आहे.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931844)
आगंतुक पटल : 143