कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

उधमपूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, डॉ जितेंद्र सिंह यांनी, पंचायत राज संस्था आणि उधमपूर जिल्हा प्रशासनासोबत घेतली आढावा बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला सर्वोत्तम सेवा घरपोच प्रदान करण्यासाठी दृढ आणि वचनबद्ध आहे : डॉ जितेंद्र सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, यावर डॉ जितेंद्र सिंह यांनी दिला भर

Posted On: 10 JUN 2023 7:08PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला सर्वोत्तम सेवा घरपोच प्रदान करण्यासाठी दृढ आणि वचनबद्ध आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. ते आज उधमपूर येथे सुरू असलेल्या विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज संस्था आणि जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, असेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी जवळीक साधून काम केले पाहिजे, यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी या बैठकीत भर दिला.

लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या फायद्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या संपर्कात राहावे, नियमित भेटी द्याव्यात तसेच दुर्गम आणि अतिदुर्गम भागात शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश डॉ. सिंह यांनी दिले.

या आढावा बैठकीला उधमपुर जिल्हा विकास परिषदेचे अध्यक्ष लाल चंद, उपाध्यक्ष जुही मनहास पठानिया, सीएसआयआर - आयआयएम चे संचालक डॉ. जबीर अहमद, उधमपूरचे उपायुक्त सचिनकुमार वैश्य, डीआयजी उधमपूर-रियासी रेंजचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सुलेमान चौधरी, उधमपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. विनोद कुमार यांच्यासह गटविकास परिषद, जिल्हा विकास परिषद आणि जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931383) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Hindi