संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

श्रीलंकेच्या सशस्त्र दलांची कार्यकुशलता आणि क्षमता निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी भारत कटिबद्ध : भारताचे संरक्षण सचिव


कोलंबो येथील ‘भारत-श्रीलंका संरक्षण परिसंवाद आणि प्रदर्शन’ कार्यक्रमात दूरदृश्‍य प्रणालीव्दारे दिला संदेश

Posted On: 07 JUN 2023 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जून 2023

कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तालयाने आज 7 जून 2023 रोजी   ‘भारत - श्रीलंका संरक्षण परिसंवाद आणि प्रदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीलंकेच्या संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंदारा तेन्नाकून यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्‍ये उभय  देशातील उद्योजक  मोठ्या संख्येने  सहभागी झाले  आणि  त्यांनी आपली  उत्पादने प्रदर्शित केली.

या कार्यक्रमाला दूरदृश्‍य प्रणालीव्दारे  संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी मार्गदर्शन केले.  श्रीलंका हा  भारताच्या दृष्‍टीने  प्राधान्य असलेला  भागीदार आहेअसे सचिव अरमाने यांनी सांगितले. आपल्या देशाच्या  'नेबरहुड फर्स्ट' म्हणजेच ‘शेजारी प्रथम’ या  धोरणाचा भाग म्हणूनश्रीलंकेच्या  सशस्त्र दलांची कार्यकुशलता  आणि क्षमता निर्मिती  सुनिश्चित करण्यासाठी भारत  वचनबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  ‘सागर’ (क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी- विकास)  ही भारताच्या सागरी धोरणाची मूलभूत संकल्पना असल्याचे म्हटले. सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणे आणि सामायिक सागरी शेजारीआपल्या मित्र देशांना फायदा मिळवून देण्यासाठी भारताच्या क्षमतेचा वापर करणे हे या संकल्पनेचे मूळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

संरक्षण सचिव  गिरीधर अरमाने  यांनी हिंद महासागर प्रदेशात दहशतवाद, चाचेगिरी, अंमली पदार्थ  आणि शस्त्रास्त्रांची तस्करी आणि बेकायदा  स्थलांतर यासारख्या  सुरक्षा आव्हानांवर प्रकाश टाकला. सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी वर्धित आणि सक्रिय सहकार्याचे आवाहन केले.

भारतीय संरक्षण क्षेत्र एका मोठ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेला चालना देताना सर्वोत्तम  संशोधन आणि विकास करून मजबूत  स्वदेशी उत्पादन परिसंस्था स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, यावर  संरक्षण सचिवांनी यावर भर दिला. तसेच  या क्षेत्रातील ज्ञानाची देवाणघेवाण करणेदोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यास मदतगार ठरेलअसे त्यांनी अधोरेखित केले.

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1930597) Visitor Counter : 151