माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून आपल्या सुधारित वेबसाईट (cbfcindia.gov.in) आणि नव्या मोबाईल ऍपचा प्रारंभ

Posted On: 06 JUN 2023 4:19PM by PIB Mumbai

मुंबई, 6 जून 2023

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत असलेल्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने आपल्या सुधारित वेबसाईटचा (cbfcindia.gov.in) आणि नव्या मोबाईल ऍपचा अलीकडेच प्रारंभ केला. आपल्या कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी 2017 पासून सुरू असलेल्या आधुनिक डिजिटायजेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेत सीबीएफसीसाठी ही कामगिरी सर्वात महत्त्वाच्या कामगिरींपैकी एक ठरली आहे.

सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या सुधारित वेबसाईटचा आणि नव्याने विकसित केलेल्या मोबाईल ऍपचा प्रारंभ केला. चित्रपटनिर्मातेअर्जदार आणि इतर वापरकर्त्यांना, सामान्यतः अधिक बहुमूल्य, वापरकर्त्यासाठी सोयीची आणि समावेशक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करणे हा यामागचा उद्देश आहे. 

गतिशीलतेने सुधारित केलेली सीबीएफसी वेबसाईट आणि नवे मोबाईल ऍप यांचा वापरकर्त्यांना समजून घेण्यासाठी सुविधाजनक, बहुमूल्य माहितीचा शोध घेण्यासाठी आणि अर्जदार आणि सीबीएफसी अधिकारी या दोघांनांही त्याचे डेस्क आणि मोबाईल डिव्हाईसवर सहजतेने वापर करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे.

सीबीएफसीच्या वेबसाईटची नवी वैशिष्ट्ये चित्रपट प्रमाणनाचे, विविध कायदे, नियम, महत्त्वाची परिपत्रके/ संप्रेषणे, न्यायालयाचे निकाल, प्रमाणित चित्रपटांची सांख्यिकी माहिती, अद्ययावत एफएक्यूज, एक हेल्प डेस्क, संपर्क, यूजर गाईड आणि नोंदणी केल्यावर एक व्हिडिओ ट्युटोरियल, अर्ज प्रक्रिया, रियल टाईम प्रोग्रेस ट्रॅकिंग आणि अर्जदारांसाठी शोध सुविधा यांचे सर्वसमावेशक आकलन करण्यास उपयुक्त आहेत. नव्या आणि आगामी कार्यक्रमांची, परिपत्रके, आदेश, अधिसूचना इ. संदर्भात सुधारित वेबसाईट योग्य वेळी अद्ययावत माहिती उपलब्ध करेल. नोंदणीकृत वापरकर्त्यांना त्यांची यापूर्वी नोंदवलेली आणि सध्या वापरात असलेली माहिती वापरूनच या वेबसाईटवर लॉग ईन करता येईल.

नव्याने विकसित मोबाईल ऍप अर्जाच्या सद्यस्थितीच्या प्रगतीचा आणि स्क्रिनिंगच्या संभाव्य तारखांचा रियल टाईम मागोवा, निमंत्रणाला आणि कारणे दाखवा नोटिस यांना प्रतिसाद देण्याची सुविधा आणि आवश्यक कागदपत्रे (10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या व्हिडिओसह) अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देते आणि त्यायोगे पूर्णपणे स्वयंचलित आणि कमीतकमी मानवी हस्तक्षेपाला प्रोत्साहन देते. त्याचप्रकारे सीबीएफसी अधिकारी स्क्रिनिंग समितीची स्थापना आणि बैठकांचे नियोजन करू शकतात, अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात, नोटिशींचे प्रतिसाद पाहू शकतात, प्रादेशिक कार्यालय बदलण्याच्या विनंतीला मान्यता देऊ शकतात.

 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1930243) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Hindi