शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी नवी दिल्ली येथे शिक्षणक्षेत्रासंदर्भातला भारतीय मानांकने 2023 हा अहवाल केला जारी


भारतीय मानांकनांमुळे विद्यार्थ्यांना देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या विषय क्षेत्रात आणि विविध श्रेणीतील तुलनात्मक स्थानांच्या आधारावर विद्यापीठांची निवड करण्यासाठी मौल्यवान साधन उपलब्ध झाले आहे - केंद्रीय मंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग

Posted On: 05 JUN 2023 8:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2023

केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी आज भारतीय मानांकने 2023 हा अहवाल जारी केला. या अहवालाद्वारे भारतातील शिक्षणसंस्थांच्या मानांकनासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2015 मध्ये तयार केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक मानांकने आराखड्याची (एनआयआरएफ) अंमलबजावणी करण्यात येत आहे.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग म्हणाले की, देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांतर्फे महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांचा दर्जा तपासण्यासाठी या संस्थांची मानांकने आणि मान्यता महत्त्वाच्या असतात.ते म्हणाले की, केंद्रीय शिक्षण विभागाने वर्ष 2015 मध्ये राष्ट्रीय संस्थात्मक मानांकने आराखड्याची रचना करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. हा आराखडा देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या विषय क्षेत्रात आणि विविध श्रेणीसंदर्भात त्यांचा दर्जा आणि उत्कृष्टता तपासण्यासाठी बहु-आयामी निर्देशांक निश्चित करतो तसेच या निर्देशांकांच्या बाबतीत या संस्थांनी मिळविलेल्या एकत्रित गुणांच्या आधारावर त्यांची स्थाने निश्चित करतो असे ते पुढे म्हणाले.

भारतीय मानांकनांमुळे विद्यार्थ्यांना देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या विषय क्षेत्रात आणि विविध श्रेणीतील तुलनात्मक स्थानांच्या आधारावर विद्यापीठांची निवड करण्यासाठी मौल्यवान साधन उपलब्ध झाले आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, या मानांकन अहवालातील निकालामुळे विद्यापीठांना अध्यापन, संशोधन, साधनसंपत्ती तसेच पायाभूत सुविधा यांच्या बाबतीत सुधारणा केली पाहिजे अशी क्षेत्रे निश्चित करण्यात मदत होते. 

विविध श्रेणी तसेच विषय क्षेत्रात मानांकनासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी भारतीय मानांकने तसेच मान्यता नियमांच्या कक्षेत अधिकाधिक शिक्षण संस्थांना आणण्याच्या दिशेने काम करण्यावर भर दिला.

भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या भारतीय मानांकनाचा अहवाल जारी होण्याचे हे सलग आठवे वर्ष आहे. वर्ष 2023 मध्ये यात ज्या तीन विशेष बाबींची भर पडली आहे, त्या खालीलप्रमाणे आहेत:

  1. कृषी आणि संबंधित क्षेत्रे या नव्या विषयाची सुरुवात.
  2. यापूर्वीच्या काळात एआरआयआयए अर्थात अभिनव संशोधन क्षेत्रातील कामगिरीसाठी संस्थांचे अटल मानांकन या उपक्रमातून अभिनव संशोधन या विषयाची मानांकने देण्यात येत असत, त्यावेळी दोन वेगवेगळ्या संस्थांना एकसारखी माहिती पुरविण्याचा शिक्षण संस्थांवरील ताण कमी करण्यासाठी या विषयाचे एकत्रीकरण
  3. मानांकनात नगर आणि शहर नियोजन या विषयांचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यासाठी  वास्तूरचना या विषयाची व्याप्ती वाढवून त्यात वास्तुरचना आणि नियोजन या विषयाची भर

 

Sl.

No.

Parameter

Marks

Weightage

1

Teaching, Learning & Resources

100

0.30

2

Research and Professional Practice

100

0.30

3

Graduation Outcome

100

0.20

4

Outreach and Inclusivity

100

0.10

5

Perception

100

0.10

भारतीय मानांकने 2023 मधील महत्त्वाची वैशिष्ट्ये :- 

  • समग्र श्रेणीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास या शिक्षण संस्थेने सलग पाचव्या वर्षी पहिले स्थान कायम राखले आहे.
  • समग्र श्रेणीमध्ये पहिल्या 100 स्थानांमध्ये 44 सीएफटीआय/सीएफयु आयएनआय, 24 राज्य विद्यापीठे, 13 अभिमत विद्यापीठे, 18 खासगी विद्यापीठे, कृषी आणि संबंधित क्षेत्रातील 4 शिक्षण संस्था आणि व्यवस्थापनविषयक शिक्षण देणाऱ्या 3 संस्थांचा समावेश आहे. 
  • विद्यापीठ विभागात बेंगळूरूच्या भारतीय विज्ञान संस्थेने सलग आठव्या वर्षी सर्वोच्च स्थान मिळविले आहे.
  • व्यवस्थापन विषयात आयआयएम, अहमदाबाद या संस्थेने सलग चौथ्या वर्षी पहिले स्थान अबाधित राखले आहे.
  • नवी दिल्ली स्थित एम्स संस्थेने वैद्यकीय विभागात सलग सहाव्या वर्षी सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.
  • नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने कृषी आणि संबंधित क्षेत्रांत सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.
  • अभिनव संशोधन क्षेत्रात आयआयटी, कानपूर या संस्थेने पहिला क्रमांक मिळविला आहे.

भारतीय मानांकने 2023 विषयक तपशील वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:

केंद्रीय शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय संस्था मानांकन आराखडा (एनआयआरएफ)

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1930087) Visitor Counter : 153


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri