नौवहन मंत्रालय
सागरी व्यापार क्षमता वाढवण्यासाठी, भूतान, बांगलादेश, भारत, म्यानमार आणि नेपाळ यांच्यातले सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2023 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2023
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनु ठाकूर यांच्यासोबत आज कोलकाता येथे, बंगालच्या उपसागरातील सागरी विकासाच्या हितसंबंधींच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीला हजेरी लावली. भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळच्या दूतांशी तसेच उद्योग आणि व्यापार प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर सोनोवाल यांनी या प्रदेशातील सागरी क्षेत्रातील दडलेल्या संधी शोधण्यासाठी सर्व हितसंबंधींना अधिक सहकार्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार भारताच्या पूर्वेकडील प्रदेश तसेच भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ सारख्या भारताच्या शेजारी देशांच्या प्रगती आणि विकासासाठी तयार करण्यात आलेले 'ऍक्ट ईस्ट' धोरण सक्षम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सोनोवाल यांनी अधोरेखित केले. SAIL, टाटा स्टील, IOC, हल्दीया पेट्रोकेमिकल्स लि., बीपीसीएल , जिंदाल स्टील, MAERSK शिपिंग लाईन्स यासारख्या कंपन्यांचे आणि इतर अनेक कॉर्पोरेट जगतातील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, सरकारच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे या प्रदेशात प्रगती आणि विकासाच्या नवीन युगाची सुरुवात करून अभूतपूर्व गती प्राप्त केली आहे, असे सर्बानंद सोनोवाल यावेळी बोलताना म्हणाले. पीएम गति शक्ती राष्ट्रीय आराखडा ही लॉजिस्टिक सुविधा सुसंगत करण्यासाठी आणि एक आकर्षक व्यवसाय प्रस्तावासाठी आणखी एक प्रोत्साहनपर योजना आहे, असे त्यांनी सांगितले. सागरी क्षेत्र तसेच अंतरदेशीय जलमार्ग क्षेत्र हे वाहतुकीच्या या दूरदर्शी योजनेमधले परिवर्तनकारक प्रमुख घटक आहेत. हे घटक आर्थिक, शाश्वत आणि कार्यक्षम पद्धतीद्वारे मालवाहतुक पद्धतीमध्ये परिवर्तन घडवतील. या महत्त्वाच्या प्रवासात, प्रत्येकासाठी जास्तीत जास्त मूल्य निर्मिती व्हावी यासाठी आम्ही तुमच्या सक्रिय समर्थन आणि जलद सहकार्याची अपेक्षा करतो.” असेही सोनोवाल म्हणाले.

"'ऍक्ट ईस्ट' धोरण हे केवळ भारताच्या पूर्वेकडील भागासाठीच नव्हे तर बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि म्यानमारच्या व्यापार आणि व्यावसायिक हित आणि प्रगतीचा अग्रदूत आहे, असेही सर्बानंद सोनोवाल म्हणाले. बांगलादेशमार्गे वाराणसी ते दिब्रुगढ असा प्रवास केलेल्या गंगा विलासच्या यशाने दक्षिण आशियाई प्रदेशात नदी पर्यटनाच्या समृद्ध क्षमतेच्या व्यवहार्यतेवर जोर दिला आहे आणि आपली समृद्ध संस्कृती आणि वारसा जगाला दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929781)
आगंतुक पटल : 161