संरक्षण मंत्रालय
सीमा रस्ते संघटना अमरनाथ यात्रा मार्गावरील दुरुस्तीची कामे 15 जून 2023 पर्यंत पूर्ण करणार
Posted On:
02 JUN 2023 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
सीमा रस्ते संघटना (BRO) अमरनाथ यात्रा मार्गावरील दुरुस्तीची कामे ही यात्रा सुरू होण्याच्या आधी म्हणजे 15 जून 2023 पर्यंत पूर्ण करणार आहे. ही यात्रा 01 जुलै 2023 ला सुरू होणार आहे. मार्गावरील बर्फ हटवणे, मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण, मार्गावरील पादचारी पुलाची दुरुस्ती, हॅन्ड रेल बसवणे इत्यादी कामांचा यात समावेश आहे.
यापूर्वी, बालताल ते पवित्र अमरनाथ गुहेपर्यंतच्या यात्रेच्या मार्गाची देखभाल जम्मू आणि काश्मीर सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत होता तर चंदनवाडी ते पवित्र गुहेपर्यंतच्या आणखी दुसऱ्या मार्गाची देखरेख पहलगाम विकास प्राधिकरण करत होते. देखभालीसाठी आणि सुधारणेसाठी सप्टेंबर 2022 मध्ये हा मार्ग सीमा रस्ते संघटना (BRO) कडे सुपूर्द करण्यात आला.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929527)
Visitor Counter : 124