वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात आयोजित तिसऱ्या बैठकीसाठी स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गट सज्ज


धोरणाच्या परिपत्रकाच्या मसुद्यावर सहमती निर्माण करण्यावर बैठकीमध्ये भर दिला जाणार

Posted On: 01 JUN 2023 5:41PM by PIB Mumbai

पणजी, 1 जून 2023

भारताच्या जी -20 अध्यक्षतेखाली स्टार्टअप 20  प्रतिबद्धता गट कार्यरत असून गोव्यात तिसरी बैठक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

या बैठकीसाठी जी -20 देशांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि भारतीय प्रतिनिधी 2 जून रोजी गोव्यात दाखल होणार आहेत.

स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गट  या महत्त्वपूर्ण बैठकीला  उपस्थित राहणाऱ्या  सर्व प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत करतो. भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील , स्टार्टअप20 ही   सहकार्य वाढवण्याची, विचार विनिमय करण्याची  आणि जागतिक स्तरावर स्टार्टअप आणि उद्योजकतेचे भविष्य घडवण्याची प्रमुख संधी आहे.

सामूहिक संकल्पासाठी संस्कृत शब्द असलेल्या "संकल्पना" या भावनेचा स्वीकार करून हा गट आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि भारतीय स्टार्टअप  व्यवस्थेच्या अनुभवी सदस्यांना एकत्र आणतो , सहयोग आणि माहितीची देवाणघेवाण वाढवतो.

स्टार्टअप20 ने अलीकडेच प्रकाशित केलेल्या आणि  जनतेचे अभिप्राय मागवलेल्या धोरणाच्या परिपत्रकाच्या मसुद्यावर  एकमत निर्माण करणे हे या  बैठकीच्या केंद्रस्थानी आहे.  या बैठकीमध्ये  स्टार्टअप प्रदर्शन , स्टार्टअप20 एक्स  मालिकेचा एक भाग म्हणून उत्कंठावर्धक चर्चा, सांस्कृतिक अनुभव आणि दस्तऐवजात नमूद केलेल्या कल्पनांच्या अंमलबजावणी आणि फायद्यांवर चर्चा होईल. या बैठकीला राज्य, केंद्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित राहतील, त्यामुळे या बैठकीचे  महत्त्व आणखी वाढणार आहे.

याशिवाय, गोवा संकल्पना कार्यक्रमामध्ये विविध उत्साहवर्धक  सत्रे असतील यात  अंतिम धोरण परिपत्रकावर  कृती दलाद्वारे सादरीकरणे, जवळच्या देशांशी चर्चा , बंद दाराआड बैठका इत्यादीचा समावेश आहे.  ही सत्रे सर्व जी 20 राष्ट्रांमधील स्टार्टअप्स आणि उद्योजकतेच्या भविष्याला आकार देतील अशा   उत्कंठावर्धक चर्चेसाठी, सहकार्याला चालना देण्यासाठी आणि पुढाकार घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतील.

शिवाय, मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासह एक भव्य स्नेहभोजनाचा  कार्यक्रम आयोजित केला असून यामुळे  प्रतिनिधींना परस्परांना जाणून घेण्याची  संधी मिळेल आणि विलोभनीय  गोव्यामध्ये होत असलेली ही बैठक प्रतिनिधींसाठी आनंददायी ठरेल.

शिवाय, आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देण्यासाठी स्टार्टअप्स बजावत असलेली महत्त्वाची भूमिका स्टार्टअप 20 अधोरेखित करेल. जागतिक आर्थिक विकासाला चालना देणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि जागतिक आव्हानांना तोंड देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.विविध प्रतिबद्धता उपक्रमांद्वारे,स्टार्ट अप 20 स्टार्टअप आणि उद्यमशीलता  यासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद आणि सहयोगाला प्रोत्साहन देते.

 

S.Patil/S.Chvan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1929098) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi