पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

पर्यावरणीय माहिती, जागरुकता, क्षमता निर्मिती आणि उपजीविका कार्यक्रम (ईआयएसीपी) केंद्रे आणि इको-क्लब्स यांच्यातर्फे लाईफ मोहिमेबाबत होत असलेला संदेशप्रसार हा जागतिक पर्यावरण दिनानिमित साजऱ्या होणाऱ्या सोहोळ्याच्या तयारीसाठी सुरु झालेल्या भव्य जागरूकता अभियानाचा अविभाज्य भाग आहे

Posted On: 30 MAY 2023 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने लाईफ मोहिमेच्या प्रोत्साहनासह जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे निश्चित केले आहे. नागरिकांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवण्यास प्रोत्साहित करुन शाश्वत जीवनपद्धतीला प्रोत्साहन देणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उपलब्ध स्त्रोतांचा जबाबदार आणि संवेदनशील वापर करण्यावर भर देणे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या लाईफ या मोहिमेची संकल्पना आधारित आहे.

संपूर्ण भारतात, लाईफ उपक्रमाविषयी व्यापक जनजागृती व्हावी आणि समर्थन मिळावे यासाठी सध्या देशात लाईफ मोहिमेसंबंधी एक महिना कालावधीची व्यापक जागरुकता मोहीम हाती घेण्यात आली आहे. “संपूर्णतः सरकार” आणि “संपूर्ण समाज” या दृष्टीकोनांना अनुसरत मंत्रालयाने केंद्रीय मंत्रालये तसेच विभाग, राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रशासने, विविध संस्था तसेच खासगी संघटना यांना लाईफ मोहिमेसंबंधीचा संदेश प्रसारित करण्यासाठी चालना दिली आहे. येत्या 5 जून 2023 रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सोहोळ्याची तयारी सुरु असताना, संपूर्ण देशात लाईफ मोहिमेसंबंधी समर्थन आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी  प्रयत्न वाढविणे हा सध्या सुरु असलेल्या या व्यापक जनजागृती मोहिमेचा उद्देश  आहे.

1.  पर्यावरणीय माहिती, जागरुकता, क्षमता निर्मिती आणि उपजीविका कार्यक्रम (ईआयएसीपी)

पर्यावरणीय माहिती, जागरुकता, क्षमता निर्मिती आणि उपजीविका कार्यक्रम (ईआयएसीपी) ही लाईफ अभियानासोबत चालविण्यात येत असलेली केंद्रीय क्षेत्रातील उपयोजना आहे.सध्याच्या व्यापक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून नागरिकांना शक्य होईल अशा शाश्वत जीवनशैलीला हातभार लावणाऱ्या कृतीबाबत जागरूकतेला प्रोत्साहन देण्यात 60 ईआयएसीपी केंद्रे सक्रियतेने सहभागी झाली आहेत.

  

   

   

 

 

2.  (EEP) पर्यावरणीय शिक्षण कार्यक्रम (ईईपी)

पर्यावरणीय शिक्षण कार्यक्रम (ईईपी) ही केंद्रीय क्षेत्रातील उपयोजना असून विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये इकोक्लब संबंधी उपक्रमांना पाठींबा देण्यासाठी इतर अनेक गोष्टींसोबत अनौपचारिक पर्यावरण शिक्षणात सहभागी होण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचे समान ध्येय सामायिक करत लाईफ मोहिमेशी संपूर्ण संरेखन करून राज्य, केंद्रशासित प्रदेश पातळीवरील अंमलबजावणी संस्थांच्या माध्यमातून ईईपी कार्यक्रम लागू करण्यात येत आहे.

जेव्हा मुले इकोक्लब चा संदेश आपापल्या कुटुंबात पसरवतात आणि पुढे समाजात नेतात तेव्हा या उपक्रमांचा होणारा परिणाम खूप मोठा असतो.

 

3.   नैसर्गिक इतिहासाचे राष्ट्रीय संग्रहालय

नैसर्गिक इतिहासाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या संचालकांनी नवी दिल्ली येथील भारती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि लाईफ मोहिमेशी संबंधित शपथ दिली  
 
4.  भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्था

लाईफ मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या व्यापक जनजागृतीचा भाग म्हणून आसाममधील तिनसुकिया  येथील बी.बी. स्मरणार्थ (उच्च माध्यमिक) सरकारी विद्यालयाने भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या सहकार्याने पोस्टर बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती.

 

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928428) Visitor Counter : 342


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil