नौवहन मंत्रालय

जेएनपीएने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले आहेत: सर्बानंद सोनोवाल


जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या 34 व्या वर्धापन दिन आणि वार्षिक पुरस्कार समारंभाला केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची उपस्थिती

Posted On: 25 MAY 2023 10:22PM by PIB Mumbai

मुंबई, 25 मे 2023

 

“जेएनपीएने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले आहेत" असे  केंद्रीय बंदर नौवहन  आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल म्हणाले. ते आज मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या (जेएनपीए) 34 व्या वर्धापन दिन आणि वार्षिक पुरस्कार समारंभात बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सरकारचे बंदर विकास मंत्री दादा भुसे, जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी आणि जेएनपीएचे उपाध्यक्ष उमेश वाघ उपस्थित होते. 

बंदराच्या भविष्यातील योजनेकडे लक्ष वेधून सोनोवाल  म्हणाले, “नजीकच्या काळात , बंदराची एकूण कंटेनर हाताळणी क्षमता 10.4 दशलक्ष टीईयू पर्यंत पोहोचेल, जे इतर सर्व प्रमुख बंदरांसाठी कठोर परिश्रम करण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण ठरेल. 

बंदरांचे  महत्त्व अधोरेखित करत  सोनोवाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि गतिमान नेतृत्वाखाली, भारत 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर  आहे. भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यात बंदरे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि जेएनपीए यात मोठी भूमिका बजावू शकेल. ”

इतक्या  मोठ्या धैर्याने इथपर्यंतचा प्रवास केल्यानंतर , मी सर्वांना आवाहन  करेन की,  आता विश्रांती न घेता यशाचा हा प्रवास सुरु ठेवावा , असे सांगत  सोनोवाल यांनी जेएनपीए  सतत करत असलेले  प्रयत्न अधोरेखित केले. बंदर क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे, आणि मला पूर्ण खात्री आहे की , आगामी काळात अधिक उंची गाठत असताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य आणि कौशल्य जेएनपीएकडे आहे.तुमच्या कामकाजादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता मी सुनिश्चित करतो ”, असे ते म्हणाले.

“जेएनपीएने गती शक्ती आणि सागरमालामध्ये यशस्वीपणे भाग घेतला आहे.पंतप्रधानांनी सुरू केलेल्या कार्यक्रमांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे, असे कार्यक्रमापूर्वी माध्यमांना संबोधित करताना सोनोवाल यांनी सांगितले. यामुळे रोजगाराच्या संधी तसेच उद्योजकता निर्माण होईल  आणि किनारपट्टीवरील समुदायाला मोठा फायदा होईल.येत्या एक वर्षात जेएनपीएला पूर्णपणे स्मार्ट बंदर बनवण्याचे मंत्रालयाचे ध्येय आहे. एक पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक प्रणाली उत्तम सेवा प्रदान करेल, असे ते म्हणाले. जेएनपीए आधुनिक पद्धतीने विकसित केले जाईल जेणेकरुन हे बंदर जगातील आघाडीच्या बंदरांशी स्पर्धा करत राहू शकेल

जेएनपीएला तुम्ही नेहमीच पाठिंबा दिला आहे त्याच प्रकारे पाठबळ देत   राहा, असे मी तुम्हाला आवाहन करतो.”, असे सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Sushma/Sonal C/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1927381) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi