युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या फिनलंडमध्ये प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला मिशन ऑलिंपिक विभागाने दिली मान्यता; टेबल टेनिसपटू पायस जैन जाणार तैवानला

Posted On: 25 MAY 2023 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मे 2023

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिंपिक सेल (MOC) ने 25 मे रोजी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या कुओर्तेन, फिनलंड येथे प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

जूनमध्ये अनेक जागतिक अॅथलेटिक्स - गोल्ड लेव्हल स्पर्धांमध्ये भाग घेणार असून  नीरजची फिनलंडमधील कुओर्तेन ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्याची इच्छा आहे.

नुकताच जागतिक क्रमवारीत नंबर एक बनणारा पहिला भारतीय भालाफेकपटू नीरज 2022 सालीही अशाच प्रशिक्षण योजनेत सहभागी झाला होता.

अन्य प्रस्तावांपैकी, MOC सदस्यांनी तैवानमधील आगाऊ प्रशिक्षण शिबिरासाठी पायस जैन यांच्या प्रस्तावालाही मान्यता दिली.

भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि साथियान ज्ञानसेकरन यांच्या अनुक्रमे वैयक्तिक प्रशिक्षक अमन बालगु आणि रमण सुब्रमण्यन यांना अनेक कार्यक्रमांसाठी घेण्याच्या प्रस्तावांनाही MOC ने मान्यता दिली. 

या आर्थिक सहाय्यामध्ये त्यांचा हवाई प्रवास खर्च, शिबिराचा खर्च, राहण्याचा आणि निवासाचा खर्च, वैद्यकीय विमा आणि भत्ता  यांचा समावेश असेल.

MOC सदस्यांनी नौकानयनपटू सलमान खानला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम्स (TOPS) विकास गटामध्ये देखील समाविष्ट केले. हरियाणाच्या मेवात भागातील सलमानने गेल्या वर्षी गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927365) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi