वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन म्हणजे सार्वजनिक हितासाठी अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला - केन्द्रीय मंत्री पियुष गोयल


राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन हा आपल्या लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणाचा प्रकल्प आहे: पियुष गोयल

Posted On: 24 MAY 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मे 2023

 

संसदीय लोकशाही हा भारताच्या विकासाचा आणि भविष्याचा पाया आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. नेवा (NeVA), अर्थात राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन म्हणजे सार्वजनिक हितासाठी अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.

देशभरातील संस्था मजबूत करणे आणि संस्थांमधील पारदर्शकता वाढवणे आवश्यक असून, राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन आपल्या लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणाचा प्रकल्प आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. गोयल म्हणाले की राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन आमदारांना केवळ त्यांच्या संबंधित विधानसभेचीच नव्हे तर इतर विधानसभेतील घडामोडींची माहिती आणि ज्ञान देऊन सक्षम करेल. ते म्हणाले की, राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन द्वारे होणाऱ्या माहितीच्या आदान- प्रदानामुळे, ज्ञानाची देवाणघेवाण होईल आणि राज्यांमध्ये सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब होईल. 

ते म्हणाले की, पंतप्रधानांनी देशाच्या डिजिटल भविष्याची कल्पना केली असून, प्रत्येकाने कर्तव्याची मानसिकता ठेवून काम केले तरच हे ध्येय गाठता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. पियुष गोयल म्हणाले की या कर्तव्याच्या भावनेला पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. 

केंद्रीय मंत्री म्हणाले की राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन हे एक एकात्मिक आणि परस्परांशी जोडलेले राष्ट्रीय पोर्टल असून, ते ‘एक राष्ट्र, एक अ‍ॅप्लीकेशन’ ही संकल्पना प्रदर्शित करते. गोयल म्हणाले की या पोर्टलचा फायदा केवळ आमदारांनाच नव्हे, तर सर्वाना होणार आहे, तसेच ते बिगर राजकीय आणि राजकारणाच्या पलीकडचे आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन भारताच्या लोकशाहीमध्ये आणि भारतीय विधिमंडळ आणि संसदीय कामकाजात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणेल. ते पुढे म्हणाले की नेवा, कार्बन उत्सर्जन तसेच विधिमंडळाच्या कामकाजामधील कागदाच्या वापरामुळे असलेली अकार्यक्षमता प्रभावीपणे कमी करेल. गोयल म्हणाले की, नेवा, देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी सर्व आमदारांना एकमेकांशी जोडून, ‘एक राष्ट्र, एक तंत्रज्ञानाचा कणा’ हे तत्त्व प्रदर्शित करते.  

राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन ला भव्य यश मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला  हवे, असे आवाहन पियुष गोयल यांनी केले. ते म्हणाले की कार्यक्षम माहिती तंत्रज्ञान कार्यपद्धतीमुळे लोकांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचते आणि राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन अधिक चांगली सेवा देण्याची संधी उपलब्ध करते.  

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926996) Visitor Counter : 89


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi