आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. मनसुख मांडविया जिनिव्हा येथे ७६व्या जागतिक आरोग्य संमेलनाला करणार मार्गदर्शन
Posted On:
22 MAY 2023 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2023
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 21 ते 30 मे 2023 या कालावधीत होणाऱ्या 76 व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आरोग्यदायी जगासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, केंद्रीय आरोग्य मंत्री 'हील इन इंडिया अँड हील बाय इंडिया' अर्थात ‘भारतामध्ये उपचार घ्या आणि भारताकडून उपचार घ्या ' तसेच वैद्यकीय क्षेत्राच्या वाटचालीत भारताचे योगदान पाहता 'क्षयरोगाविरुद्ध आपण एकत्र लढा देऊया' आणि भारताच्या 2025 पर्यंत भारतातून क्षयरोग हद्द पार करण्याच्या संकल्पच्या अनुषंगाने आयोजित समारंभात मुख्य भाषण देतील.
24 मे 2023 पर्यंतच्या आपल्या मुक्कामादरम्यान, डॉ. मांडविया जगभरातील देशांच्या प्रतिनिधींबरोबर आयोजित विविध द्विपक्षीय बैठकांना उपस्थित राहतील.
* * *
S.Bedekar/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926465)
Visitor Counter : 137