अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उदारीकृत वित्तप्रेषण योजना अर्थात ‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस)’योजनेअंतर्गत छोट्या डेबिट / क्रेडिट व्यवहारांसाठी टीसीएस -स्त्रोतावर कर संकलन  लागू करण्याबाबत  स्पष्टीकरण

Posted On: 19 MAY 2023 7:11PM by PIB Mumbai

 

1 जुलै 2023 पासून उदारीकृत वित्तप्रेषण योजना अर्थात लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस)योजनेअंतर्गत छोट्या व्यवहारांसाठी स्त्रोतावर कर संकलन (टी सी एस) लागू होण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोणतीही प्रक्रियात्मक संदिग्धता टाळण्यासाठी, असा निर्णय घेण्यात आला आहे की एखाद्या व्यक्तीने त्यांचे आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून प्रत्येक आर्थिक वर्षात  केलेली  7 लाख रुपयांपर्यंतचे कोणतेही व्यवहार  एलआरएस मर्यादेमधून वगळली जातील आणि त्यामुळे स्त्रोतावर कर संकलन(टी सी एस) लागू होणार नाही.

शिक्षण आणि आरोग्य विषयक देयकांना  स्त्रोतावर कर संकलन(टी सी एस) योजनेच्या कक्षेतून वगळण्याची सध्याची लाभकारक व्यवस्था  कायम राहील.

(विदेशी मुद्रा  व्यवस्थापन (चालू खाते व्यवहार नियम), 2000) च्या नियमांमध्ये आवश्यक बदल स्वतंत्रपणे जारी केले जातील.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925638) Visitor Counter : 256


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu