इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यूपीआयमध्ये सामील होण्याच्या जपानने दाखवलेल्या स्वारस्याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य

Posted On: 19 MAY 2023 6:45PM by PIB Mumbai

 

जवळपास प्रत्येक जागतिक मंच, मग तो जी-20 असो, एससीओ किंवा जी-7, जिथे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल इंडिया संकल्पना मांडत आहोत, तिथे याबाबत खूप चांगले आकर्षण निर्माण होत आहे. मोदीजींनी डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे केले हे लोकांना समजले आहे. पंतप्रधान मोदी यांचा डिजिटल इंडियाचा गहन आणि व्यापक दृष्टीकोन स्वीकारल्याबद्दल मी जपानच्या डिजिटल मंत्र्याचे आभार मानतो.असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती आणि तंत्रज्ञान, रेल्वे आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.  भारताच्या युपीआय पेमेंट प्रणालीमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असल्याच्या जपानचे डिजिटल परिवर्तन  मंत्री कोनो तारो यांच्या विधानाला अश्विनी वैष्णव उत्तर देत होते.

आम्ही नुकतीच आमच्या जी-7 सदस्य देशांच्या डिजिटल मंत्र्यांची बैठक घेतली होती. भारताचे डिजिटल मंत्री वैष्णव आमच्यासोबत या बैठकीत सामील झाले होते. आणि आत्ता, जपान आणि भारत डिजिटल सहकार्याला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जपानचे डिजिटल मंत्री कोनो तारो यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आम्ही आता भारतीय यूपीआय पेमेंट सिस्टममध्ये सामील होण्याचा गांभीर्याने विचार करत आहोत. आम्ही सहकार्यातून सुरुवात करून ई-आयडी परस्पर कसे ओळखायचे  याचाही विचार करत आहोत जेणेकरून आम्ही इंटरऑपरेबिलिटी वाढवू शकतो.असेही जपानच्या डिजिटल मंत्र्यांनी सांगितले.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1925615) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil