विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटनेच्या  (एस सी ओ) सदस्य राष्ट्रांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये अधिक सहयोगाने कार्य करण्यासाठी एकत्र येण्याचे भारताचे आवाहन

Posted On: 19 MAY 2023 4:01PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटना (एस सी ओ) च्या सदस्य राष्ट्रांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये अधिक सहयोगाने कार्य करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह  यांनी केले आहे. यजमान आयोजक देशाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री या नात्याने ते आज एस सी ओ सदस्य राष्ट्रांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांच्या प्रमुखांच्या सातव्या सत्राला संबोधित करत होते. युरेशियन प्रदेशासमोरील उदयोन्मुख आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत, इतर एस सी ओ सदस्य राष्ट्रांशी निकट सहकार्याच्या भावनेने काम करायला तयार आहे, असे जितेंद्र सिंग म्हणाले.

एस सी ओ सदस्य देशांसमवेत सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या सहभागाचे आणि केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

एस सी ओ संघटना अस्तित्वात आल्यापासून गेल्या दोन दशकांमध्ये युरेशियन प्रदेशात बहुआयामी सहकार्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्यात एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आली आहे आणि या प्रदेशात महत्वपूर्ण सहकार्याचा उपयोग करण्यासाठी भारत एस सी ओ ला विशेष महत्व देतो, असे डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले.

पर्यावरणीय आणि हवामान विषयक मुद्द्यांसंदर्भात भारताची वचनबद्धता कायम असल्याचा पुनरुच्चार सिंग यांनी केला. राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा मिशन ची स्थापना आणि अशा अनेक उपक्रमांच्या  प्रारंभासह  2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचा वापर करून उर्जेच्या 50 टक्के गरजा पूर्ण करण्याची  कॉप 26 मधील आपली वचनबद्धता पूर्ण करण्याच्या उद्देशाने  भारत प्रगती करत आहे, असे ते म्हणाले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या तिन्ही आयामांमध्ये संतुलित आणि समन्वित प्रयत्न करण्यासाठी निकट सहकार्याने कार्य करण्याची भारत सरकारची  वचनबद्धता डॉ जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केली.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925557) Visitor Counter : 93


Read this release in: English , Urdu , Hindi