दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दूरसंचार विभागाने साजरा केला जागतिक दूरसंचार दिन

Posted On: 17 MAY 2023 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2023

केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री  देवुसिंह चौहान यांनी आज, 17 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनाचे औचित्य साधून जागतिक दूरसंचार दिन परिषदेचे उद्‌घाटन केले. त्यांनी स्टार्ट-अप्सद्वारे  दूरसंचार  क्षेत्रातील नवनवीन शोध दर्शविणार्‍या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. दूरसंचार विभागाच्या यूनिवर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड म्हणजेच यूसओएफ ला  20 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ जारी केलेल्या एका टपाल तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.  देवुसिंह चौहान यांनी USOF@India या पुस्तकाचे अनावरण  आणि टेस्ट बेड प्रोजेक्टचे सुद्धा यावेळी अनावरण केले.

उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भारतीय उद्योजकांची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले . भारताच्या शेवटच्या गावापर्यंत  दूरसंचार जोडणी सुनिश्चित  करणाऱ्या चार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचेही अभिनंदन करण्यात आले. आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रमाण संवाद बैठकीचा अहवालही यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. याव्यतिरिक्त, दूरसंचार क्षेत्रातील  योगदानासाठी आणि उत्कृष्ट कार्यासाठी दूरसंचार विभागाचे कर्मचारी आणि सर्वोत्तम कामगिरी केलेल्या फील्ड युनिट्सना देखील  पुरस्कार देण्यात आला.  दूरसंचार विभागाच्या फील्ड युनिटसाठी सर्वोत्तम कामगिरीसाठीचा  पुरस्कार एलएसए  आंध्र प्रदेश, सीसीए  एनई-II आणि डब्ल्युएमओ,आयएमएस चेन्नई यांना देण्यात आला. दूरसंचार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

या उद्‌घाटनाप्रसंगी देवुसिंह चौहान म्हणाले की, आज जागतिक दूरसंचार दिन आहे आणि जगासह आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आयटीयू  हा दिवस भारतासोबत सुद्धा साजरा करत आहे. त्यांनी नमूद केले की हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आज, दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली, 20 वर्षांपूर्वी दूरसंचार विभागाच्या यूसओएफ  विभागाची स्थापना करण्यात आली होती.

दूरसंचार विभागाचे सचिव  के राजारामन यांनी संचार साथी पोर्टलच्या विकासात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. हे पोर्टल वापरकर्त्यांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी नागरिक केंद्रित करण्यात आले आहे. पोर्टलची लिंक ( https://sancharsaathi.gov.in ) ही आहे. विश्वासार्ह, मजबूत आणि सुरक्षित दूरसंचार पायाभूत सुविधा प्राप्त करण्यासाठी एकत्र काम करण्याचे महत्त्व सांगून त्यांनी या परिषदेचा समारोप केला.

 

S.Kane/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1925014) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu