आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य संशोधन विभाग (डीएचआर) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांच्यात सहाय्यक तंत्रज्ञानावरील प्रकल्प सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
17 MAY 2023 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य संशोधन विभाग (डीएचआर) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांच्यात संशोधन, नावीन्य आणि क्षमता निर्मितीला प्रोत्साहन देऊन उच्च दर्जाच्या किफायतशीर सहाय्यक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प सहकार्य करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती देण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेने 10.10.2022 रोजी आणि आरोग्य संशोधन विभागाने (डीएचआर) 18.10.2022 रोजी प्रकल्प सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.
या सहकार्याचा उद्देश सहाय्यक तंत्रज्ञानाच्या वापराकडे जगाचे लक्ष वेधणे, संशोधन आणि नवोन्मेषला चालना देणे आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे आणि त्याचा प्रसार करणे हा आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1924842)
आगंतुक पटल : 159