सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दुसऱ्या G20 सांस्कृतिक कार्यगटाच्या बैठकीसाठी प्रतिनिधी ओदिशात दाखल , पुरी येथे ‘संस्कृती सर्वांना एकत्र आणते ’ या संकल्पनेवरील वाळूशिल्प  प्रदर्शनाला भेट दिली


जी. किशन रेड्डी आणि अर्जुन राम मेघवाल यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुदर्शन पटनाईक यांच्या ‘संस्कृती सर्वांना एकत्र आणते ’ या संकल्पनेवरील वाळूशिल्प  प्रदर्शनाचे केले उद्घाटन

Posted On: 14 MAY 2023 8:41PM by PIB Mumbai

 

G20 सदस्य, अतिथी राष्ट्रे आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी आज ओदिशातील भुवनेश्वर येथे दुसऱ्या G20 सांस्कृतिक कार्यगटाच्या बैठकीसाठी दाखल झाले. फेब्रुवारीमध्ये खजुराहो येथे झालेल्या पहिल्या सांस्कृतिक कार्यगटाच्या बैठकीतील चर्चा तसेच : सांस्कृतिक संपत्तीचे संरक्षण आणि पुनर्स्थापना; शाश्वत भविष्यासाठी वारसा जतन सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन; आणि संस्कृतीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या सांस्कृतिक कार्यगटाच्या चार प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या तज्ज्ञांच्या जागतिक संकल्पनांवरील  वेबिनारमधील चर्चेवर सर्वसहमती साधणे  हा या बैठकीचा उद्देश आहे.

सांस्कृतिक संपत्तीचे संरक्षण आणि पुनर्स्थापना, सांस्कृतिक आणि सृजनशील उद्योगांच्या शाश्वत भविष्यातील संवर्धनासाठी जिवंत वारशाचा उपयोग आणि सृजनशील अर्थव्यवस्था तसेच संस्कृती संरक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या सांस्कृतिक कार्य गटाच्या चार प्राधान्य क्षेत्रांवर सत्रे होतील अशी माहिती सभेच्या अजेंड्याबाबत बोलताना मंत्र्यांनी दिली.

"सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, संयुक्त वारसा संवर्धन प्रकल्प आणि परस्पर-सांस्कृतिक संवाद यासारख्या सहयोगी उपक्रमांवर देखील चर्चा केली जाईल. हे उपक्रम परस्पर संबंध आणखी मजबूत करतील तसेच अधिक लवचिक आणि एकमेकांच्या संपर्कात असलेले  समुदाय तयार करू शकतील." असेही ते म्हणाले.

image1.jpg

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सांस्कृतिक संपत्तीची पुनर्स्थापना वेगाने होत आहे, असे सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले.

ते म्हणाले की शाश्वत भविष्यया विषयावरील चर्चा, आपल्या पुढच्या पिढीला काय वारसा देते यावर लक्ष केंद्रित करणारी असेल. सांस्कृतिक स्थळे आर्थिक घडामोडींशी जोडली जावीत आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशा स्थळांवर पर्यटन विकसित केले जावे, असेही ते म्हणाले. अशा स्थळांवर तंत्रज्ञानाचा प्रचार केला जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

पद्मश्री सुदर्शन पटनायक यांचे एक  उत्कृष्ट असे वाळू कला प्रदर्शन पुरीच्या समुद्र किनार्‍यावर  आयोजित करण्यात आले होते. कल्चर युनाइट्स ऑलया संकल्पनेनुसार तयार करण्यात आलेल्या या  वाळू कला प्रदर्शनाचे उद्घाटन  केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी   आणि सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

 सांस्कृतिक कार्य गटाची तिसरी  बैठक भुवनेश्वरमध्ये पुढील 2 दिवसांच्या चर्चेनंतर,15 ते 18 जुलै 2023 दरम्यान हम्पी येथे होणार आहे. ऑगस्ट 2023 च्या अखेरीस सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक वाराणसीमध्ये होणार आहे

***

R.Aghor/S.Kane/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924096) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali , Odia