संरक्षण मंत्रालय

भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय सराव समुद्र शक्ती – 23

Posted On: 14 MAY 2023 6:00PM by PIB Mumbai

 

14 ते 19 मे 2023 या कालावधीत भारत-इंडोनेशिया चौथ्या द्विराष्ट्रीय युद्धसराव, समुद्र शक्ती-23 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका, आयएनएस कावरत्ती इंडोनेशियाच्या बाटम येथे पोहोचली आहे.

देशी बनावटीची ही युद्धनौका एएसडब्ल्यू कॉर्व्हेटने विकसित केली  आहे. भारतीय नौदलाचे  या युद्धनौकेत डॉर्नियर सागरी गस्ती विमान आणि चेतक हेलिकॉप्टर देखील या संयुक्त युद्धसरावात सहभागी होणार आहे.  इंडोनेशियाच्या नौदलाचे प्रतिनिधित्व  केआरआय सुलतान इस्कंदर मुडा, सीएन 235 सागरी गस्ती विमानआणि एएस 565 पँथर हेलिकॉप्टर हे करतील

या संयुक्त युद्धसरावामुळे, दोन्ही देशातील आंतर- कार्यवाही, संयुक्त मोहीम राबवणे आणि परस्पर सहकार्य यात वाढ होईल.

या दरम्यान बंदर सरावाच्या टप्प्यात परस्परांच्या नौकांना भेटी, व्यावसायिक संवाद, विविध विषयातील तज्ञांची देवाणघेवाण आणि क्रीडा सामने यांचा समावेश असेल.

समुद्रावरील सरावादरम्यान, शस्त्रास्त्रांद्वारे गोळीबार, हेलिकॉप्टर सराव, पाणबुडी विरोधी युद्धतंत्र आणि हवाई संरक्षण सराव आणि युद्धनौकेवरील प्रात्यक्षिके केली जातील. 

समुद्र शक्ती-23 युद्ध सरावातून, दोन्ही देशांच्या नौदलांमधील उच्च पातळीवरील परस्पर सहकार्य  आणि या भूप्रदेशातील शांतता आणि स्थैर्यासाठी त्यांची समान वचनबद्धता दिसणार आहे.

***

R.Aghor/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924080) Visitor Counter : 194