पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“पाणी आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी त्याचे महत्त्व” या संकल्पनेसह "जागतिक स्थलांतरित पक्षी दिन" साजरा


Posted On: 13 MAY 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2023

 

जागतिक पर्यावरण दिनाचे (5 जून) औचित्य साधत पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE) वर देशभरात मोठ्या प्रमाणावर सामूहिक उपक्रम आयोजित करण्यात आले.

त्यांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे:

1) नॅशनल म्युझियम ऑफ नॅच्युरल हिस्ट्री (NMNH)-

राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाने नॅशनल म्युझियम ऑफ नॅच्युरल हिस्ट्री या निसर्गविषयक राष्ट्रीय इतिहास संग्रहालयाच्या सहकार्याने मिशन LiFE साठी सामूहिक उपक्रम आयोजित केला आहे.  ही मोहीम 5 जून, 2023 पर्यंत अशी एकूण एक महिना चालणार आहे. आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. यावर्षी  हा दिवस 13 मे 2023 रोजी साजरा केला जातोय.या दिवसाची या वर्षीची संकल्पना“पाणी आणि त्याचे स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्व  " आहे. कारण आपल्या ग्रहावरील जीवनासाठी पाणी ही मूलभूत गरज आहे.  स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनचक्रातील बराच काळ पाण्याच्या अधिवासावर अवलंबून असतो.  "जागतिक स्थलांतरित पक्षी दिवसानिमित्त आयोजित वार्षिक जनजागृती उपक्रम, स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर भर देणारा होता.

   

 

2) झूऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया:

कोलकाता इथल्या झूऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेने मिशन LiFE अंतर्गत स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी विवेकानंद कॉलेज टाकुरपुकुर, कोलकाता येथील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली.

 

3) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मैनेजमेंट (NCSCM) -

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मैनेजमेंट या सागरी किनाऱ्यावरील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत संस्थेने पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE) या मोहिमेचा भाग म्हणून कोवलमच्या मासेमारी गावात स्वच्छता आणि जागृती कार्यक्रम आयोजित केला होता. तामिळनाडूच्या ईशान्य किनार्‍यावर, कांचीपुरम जिल्ह्यात कोवलम या गावी ही मोहीम राबवण्यात आली.

 

4) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हिमालयन एनव्हायरोमेन्ट -

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हिमालयन एनव्हायरोमेन्ट या लदाखमधील संस्थेने आज म्हणजेच, 13 मे 2023 रोजी, केंद्र संचालकांच्या नेतृत्वाखाली लडाखमधील लेह मुख्य बाजारपेठ परिसरात मिशन LiFE अंतर्गत जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती मोहीम राबवली.  या कार्यक्रमात नगरपालिका समिती (लेह), संशोधक आणि शास्त्रज्ञांसह एकूण 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

   

 

* * *

R.Aghor/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923942) Visitor Counter : 185


Read this release in: Telugu , English , Hindi , Urdu