गृह मंत्रालय
गृह मंत्रालयातर्फे 13 आणि 14 जुलै, 2023 रोजी हरियाणातील गुरुग्राम येथे "नॉन फंजिबल टोकन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटावर्सच्या युगात गुन्हेगारी आणि सुरक्षा या विषयावर जी 20 परिषदेचे" आयोजन
प्रस्तावित जी 20 परिषदेविषयी विस्तृत चर्चेसाठी आज नवी दिल्लीत गोलमेज बैठकीचे आयोजन
केंद्रीय गृह सचिवांनी आगामी परिषदेच्या स्वरूपाविषयी सहभागी मान्यवरांना माहिती देवून परिषदेसाठी उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवण्याची देशांना केली विनंती
Posted On:
12 MAY 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2023
गृह मंत्रालयातर्फे 13 आणि 14 जुलै, 2023 रोजी हरियाणातील गुरुग्राम येथे "एनएफटी (नॉन फंजिबल टोकन), कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटावर्सच्या युगात गुन्हेगारी आणि सुरक्षा या विषयावर जी 20 परिषदेचे" आयोजन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), परराष्ट्र मंत्रालय (MEA), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) हे विभाग संयुक्तपणे करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ, राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ,राष्ट्रीय भारतीय विधी विद्यापीठ , इंटरपोल आणि यूएनओडीसी हे आयोजक भागीदार असणार आहेत.
प्रस्तावित जी 20 परिषदेविषयी विस्तृत चर्चेसाठी आज नवी दिल्लीत गृह मंत्रालयाने गोलमेज बैठकीचे आयोजन केले होते. यात 20 हून अधिक देशांतील राजदूत, उच्चायुक्त आणि वरिष्ठ मान्यवरांसह भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि संघटना आणि भागीदार संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोलमेज बैठकीदरम्यान केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी सहभागी मान्यवरांना आगामी परिषदेच्या स्वरूपाविषयी माहिती दिली आणि देशांना परिषदेसाठी उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली.
या परिषदेद्वारे जी-20 देश, अतिथी/निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकत्र येतील. मंत्रालय/ सरकारी संस्था, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव/प्रशासक, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, सायबर तज्ञ आणि कायदेशीर बंधुत्वाचे प्रतिनिधीत्व करणारे अतिथी वक्ते, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, आर्थिक मध्यस्थ, फिनटेक, सोशल मीडिया मध्यस्थ, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, सायबर फॉरेन्सिक्स, नियामक, स्टार्टअप्स, ओव्हर द टॉप (ओटीटी) सेवा प्रदाते, ई-कॉमर्स कंपन्या आदींचाही यात सहभाग असेल.
S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923821)
Visitor Counter : 179