सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो 2023 चे करणार उद्घाटन
Posted On:
10 MAY 2023 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 2023 चे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी के रेड्डी यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशा प्रकारचा हा पहिलाच, सर्वसमावेशक तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो आहे.
रेड्डी म्हणाले, "प्रगती मैदानावर होणारा आगामी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 2023 ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण सरकार पहिल्यांदाच संग्रहालयांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपक्रम प्रदर्शित करणार आहे. संग्रहालय विकास विभागासह विविध विभागांचे तज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्याने भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शनात ठेवला जाईल. सांस्कृतिक मंत्रालयाने आजपर्यंत 383 संग्रहालयाची स्थापना केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आणि दूरदृष्टीने गेल्या 9 वर्षात त्यापैकी 145 संग्रहालये सुरू झाली आहेत. आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 2023 हे अशा प्रकारचे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. त्यातील कार्यशाळा आणि मास्टर क्लासेससाठी केवळ भारतीय व्यावसायिकांनाच नाही तर जगभरातील तज्ञांना निमंत्रित केले आहे. "
यावेळी एका पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच मान्यवरांनी “म्युझियम ऑन व्हील्स” या जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला.
समग्र संवाद सुविधा उपलब्ध करून देणे आणि देशभरातील विविध संग्रहालयांमधून प्रदर्शित केलेल्या विविध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम 18 ते 20 मे दरम्यान नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्यानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि परस्पर -सांस्कृतिक माहिती आणि आकलन यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम संग्रहालय व्यावसायिक आणि रसिकांसाठी एक व्यापक व्यासपीठ प्रदान करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती, इतर सरकारी अधिकारी, संग्रहालय व्यावसायिक आणि राष्ट्रीय ते समुदाय स्तरापर्यंत संरेखित सेवा-तंत्रज्ञान प्रदाते, शिक्षणतज्ज्ञ , शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनादरम्यान, विविध संकल्पना असलेल्या संग्रहालयांवर लक्ष केंद्रित केले जाईल, कार्यशाळा, परिसंवाद , तज्ज्ञांचे मार्गदर्शन , चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांद्वारे या संग्रहालयांबद्दल माहिती मिळवली जाईल. . आंतरराष्ट्रीय संग्रहालय व्यावसायिक, राजदूत , अभिरक्षक (क्युरेटर), सल्लागार, शिक्षणतज्ज्ञ आणि जगभरातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले असून हा उपक्रम अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आणि सहयोगासाठी एक अनोखी संधी प्रदान करतो.
7 मास्टरक्लास म्हणजेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि 11 चर्चासत्र हे या तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मास्टरक्लासेस हे व्याख्यान आणि प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात असतील तसेच जागतिक तज्ञांच्या नेतृत्वात संग्रहालयांच्या जागेच्या कामकाजाशी संबंधित विशिष्ट विषयावरील चर्चा यात होणार आहे. चर्चासत्रांमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय तज्ञ आणि सल्लागार सहभागी होतील यात अपारंपरिक संग्रहालये, प्रत्येकासाठी क्युरेटिंग आणि संग्रहालयांमधील आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.व्हिजन 2047 नावाचे एक मंत्रीस्तरीय गट देखील आहे ज्यात 12 राज्यांचे सांस्कृतिक मंत्री त्यांच्या राज्यातील संग्रहालयांच्या विकासासाठी त्यांच्या दृष्टिकोनावर चर्चा करतील.. याव्यतिरिक्त, सचिवस्तरीय गटामध्ये संग्रहालयांना निधी देणाऱ्या अभिरक्षण करणाऱ्या आणि विकसित करणाऱ्या भारत सरकारच्या इतर मंत्रालये/विभागांमधील सचिव-स्तरीय 9 सचिवांचा सहभाग असेल.
एक्स्पोचा (प्रदर्शनाचा) एक वैशिष्ट्यपूर्ण घटक असलेला ‘टेक्नो मेला’, हा संग्रहालय बनवू इच्छिणारे आणि त्यासाठी खास सेवा देणाऱ्या तांत्रिक विक्रेते, यांच्यात B2B नेटवर्किंग सुलभ करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. या पैलूमध्ये प्रकाश योजना आणि तांत्रिक उपकरणे विक्रेते, यांच्यासह राष्ट्रीय स्तरापासून ते समुदाय स्तरावरील काही संग्रहालयांच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. 55 पेक्षा जास्त विक्रेते/संस्थांपैकी, या विभागातील काही प्रमुख सहभागींमध्ये भारतीय नौदल, राष्ट्रीय रेल संग्रहालय, i2i कन्सल्टिंग, अथाह इन्फोटेक, वराह, लायन इंडिया, गोदरेज, डेकॉन लाइटिंग यांचा समावेश आहे. थोडक्यात, 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या तीन दिवसांच्या संवर्धन प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून, यामध्ये ते कागद, कापड, आणि टॅक्सीडर्मीच्या प्रतिबंधात्मक संवर्धनाचे प्रशिक्षण घेतील. त्यांना या क्षेत्रातील करियरच्या संधी आणि रोजगार देणाऱ्यांची ओळखही करून दिली जाईल.
S.Patil/Prajna/Sonal C/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923247)
Visitor Counter : 214