रेल्वे मंत्रालय
भारताच्या अध्यक्षतेखाली शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य राष्ट्रांच्या रेल्वे प्रशासन प्रमुखांची बैठक
सदस्य देशांनी 2023-2025 साठी कार्य योजना स्वीकारली आणि एससीओ सदस्य देशांच्या रेल्वे प्रशासनांमधील परस्पर संवादाच्या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठीच्या कृती आराखड्याच्या मसुद्याला दिली मंजुरी
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
भारताच्या अध्यक्षतेखाली 8-10 मे 2023 दरम्यान शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य देशांच्या रेल्वे प्रशासन प्रमुखांची बैठक झाली.

या बैठकीला एससीओ सदस्य देशांच्या (भारत प्रजासत्ताक , कझाकस्तान प्रजासत्ताक, पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन , किर्गिझ प्रजासत्ताक, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, रशियन महासंघ , ताजिकिस्तान प्रजासत्ताक, उझबेकिस्तान प्रजासत्ताक) रेल्वे प्रशासनाचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
रेल्वे मंत्रालया अंतर्गत असलेल्या रेल्वे बोर्डाच्या सदस्य (परिचालन आणि व्यवसाय विकास) जया वर्मा सिन्हा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.
या बैठकीत एससीओ सदस्य राष्ट्रांनी 2023-2025 साठी कार्य योजना स्वीकारली आणि एससीओ सदस्य राष्ट्रांच्या रेल्वे प्रशासनामधील परस्पर संवादाच्या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठीचा मसुदा कृती आराखडा मंजूर केला
क्षेत्रीय रेल्वे कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांचा विकास, बहुस्तरीय वाहतूक, एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापार आणि आर्थिक उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटलीकरणासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1923242)
आगंतुक पटल : 219