ऊर्जा मंत्रालय
ऊर्जा कार्यक्षमता विभागाच्या स्टार लेबलिंग कार्यक्रमामुळे स्प्लिट एसीच्या ऊर्जा कार्यक्षमतेत एक तारांकित स्तरावर 43% आणि पंच तारांकित स्तरावर 61% सुधारणा, विंडो एसीसाठी एक तारांकित स्तरावर 17% आणि पंचतारांकित स्तरावर 13% सुधारणा
ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टर-आधारित एसीचा बाजारातील हिस्सा गेल्या 8 वर्षांत 1% वरून 77% पर्यंत वाढला आहे
Posted On:
10 MAY 2023 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
भारताच्या ऊर्जा कार्यक्षमता धोरणांमुळे वातानुकूलित यंत्रांच्या(एसी ) एकूण ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा होण्यासोबतच उच्च ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टर तंत्रज्ञानाच्या उपयोजनालाही गती मिळाली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा कार्यक्षमता विभागाच्या (BEE) आकडेवारीनुसार स्प्लिट रूम एअर कंडिशनर्स (RACs) साठी ऊर्जा कार्यक्षमता , एकूण ऊर्जा कार्यक्षमता सुधारणा एक तारांकित स्तरावर 43% आणि पंच तारांकित स्तरासाठी 61% आहे. दुसरीकडे, विंडो RAC साठी एकूण ऊर्जा कार्यक्षमता सुधारणा एक तारांकित स्तरावर 17% आणि पंच तारांकित स्तरासाठी 13% आहे.
आकृती 1: विंडो आणि स्प्लिट एसीसाठी एक तारांकित आणि पंच तारांकित स्तरावर सुधारणा
विभागाने जून, 2015 मध्ये, इन्व्हर्टर RACs साठी भारतीय हंगामी ऊर्जा कार्यक्षमता गुणोत्तर (ISEER) नावाच्या नवीन स्टार रेटिंग पद्धतीसह एक ऐच्छिक लेबलिंग कार्यक्रम सुरू केला. जानेवारी 2018 पासून अनिवार्य करण्यात आला.
वर्ष 2015-16 ते 2022-23 या आठ वर्षांमध्ये, अधिक कार्यक्षम, परिवर्तनीय गती (इन्व्हर्टर) RAC चा बाजारातील हिस्सा 1% वरून 99% पर्यंत वाढला आहे, तर याच कालावधीत स्थिर गती RAC चा 99% वरून 23% पर्यंत कमी झाला आहे. आरएसीचा एकूण बाजार वर्ष 2020-21 पर्यंत 6.6 दशलक्ष युनिट्सवर पोहोचला. परिवर्तनीय गती (इन्व्हर्टर) RAC धोरणाचा अवलंब केल्यामुळे कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या दिशेने बाजारपेठेतील हे परिवर्तन शक्य झाले. वीज आणि खर्च बचतीच्या दृष्टीने ग्राहकांसाठी हे फायदेशीर आहे.
आकृती- 2: स्थिर गती आणि परिवर्तनीय गती RAC चे बाजार परिवर्तन
हे हस्तक्षेप भारताचा शीतकरण कृती आराखडा (ICAP) चा एक भाग आहेत. यामागचे उद्दिष्ट 20 वर्षांच्या कालावधीसह शीतकरणाची (कूलिंगची) मागणी कमी करणे, रेफ्रिजरंट(प्रशीतक) संक्रमण, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि अधिक चांगले तंत्रज्ञान पर्याय समाविष्ट करून सर्व क्षेत्रांमध्ये शीतकरणाबाबत एकात्मिक दृष्टीकोन प्रदान करणे आहे.
स्टार लेबलिंग कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतल्या प्रगतीबाबत बोलताना ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार म्हणाले की, हा कार्यक्रम त्याचे निर्धारित निष्कर्ष साध्य करत आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे आणि त्यामुळे पुढील काही दशकांमध्ये शीतकरणाची (कुलींग) मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. भारताच्या शीतकरण कृती आराखडा अंतर्गत, विस्तृत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आपण आपल्या विकासाच्या गरजा पूर्ण करताना त्या अधिक कार्यक्षम रीतीने पूर्ण करू शकू हे सुनिश्चित होईल. ऊर्जा कार्यक्षमता विभागाचे महासंचालक अभय बाक्रे म्हणाले की भारताचा शीतकरण कृती आराखडा ही सर्व क्षेत्रांचा समावेश असलेली व्यापक योजना आहे आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
Star level
|
Jan 2009- Dec 2011
|
Jan 2012- Dec 2013
|
Jan 2014-Dec 2017
|
Jan 2018- June 2022
|
July 2022-Dec 2024
|
1 star
|
2.3
|
2.5
|
2.7
|
3.1
|
3.3
|
2 star
|
2.5
|
2.7
|
2.9
|
3.3
|
3.5
|
3 star
|
2.7
|
2.9
|
3.1
|
3.5
|
3.8
|
4 star
|
2.9
|
3.1
|
3.3
|
4.0
|
4.4
|
5 star
|
3.1
|
3.3
|
3.5
|
4.5
|
5.0
|
अनुक्रमे तक्ता - 1 आणि तक्ता - 2 मध्ये दर्शवल्याप्रमाणे, उर्जा कार्यक्षमतेचा दर्जा वाढवण्यासाठी स्प्लिट आणि विंडो RAC साठी ऊर्जा कार्यक्षमता विभाग स्टार रेटिंग योजनेत सुधारणा करत आहे.
तक्ता 1 नुसार, तांत्रिक तसेच आकाराच्या मर्यादांमुळे विंडो RAC च्या तुलनेत स्प्लिट RAC च्या बाबतीत कार्यक्षमता सुधारणेत वारंवार आणि लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. (तक्ता - 2 पहा). स्प्लिट RAC साठी कार्यक्षमता मूल्यांमध्ये (ISEER) केलेली सुधारणा आकृती- 1 मध्ये सादर केली आहे.
Star level
|
Jan 2009- Dec 2013
|
Jan 2014 - June 2022
|
July 2022 - Dec 2024
|
1 star
|
2.3
|
2.5
|
2.7
|
2 star
|
2.5
|
2.7
|
2.9
|
3 star
|
2.7
|
2.9
|
3.1
|
4 star
|
2.9
|
3.1
|
3.3
|
5 star
|
3.1
|
3.3
|
3.5
|
JPS/ST/Sonali/Sushama/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923121)
Visitor Counter : 184