संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसियान-भारत सागरी सराव- 2023

प्रविष्टि तिथि: 09 MAY 2023 6:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

पहिल्या आसियान भारत सागरी  सराव-2023 (AIME-2023)  8 मे 2023 रोजी दक्षिण चीन समुद्रात  यशस्वीरित्या पार पडला. या बहुपक्षीय नौदल सरावाच्या सागरी टप्प्यात नऊ जहाजे आणि सुमारे 1400 जवानांनी भाग घेतला.भारतात डिझाइन केलेली आणि स्वदेशी बनावटीची विनाशिका आयएनएस  दिल्ली आणि  आयएनएस सातपुडा, सागरी गस्ती विमान P 8I आणि अविभाज्य घटक असलेली हेलिकॉप्टर्स यांनी ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आसियान देशांच्या नौदलाच्या जहाजांबरोबर  सराव केला.

समुद्रात झालेल्या  दोन दिवसीय टप्प्यात विविध प्रकारच्या  सामरिक कसरती, हेलिकॉप्टरद्वारे क्रॉस डेक लँडिंग,नाविकांची प्रात्यक्षिके आणि इतर सागरी कारवायांसह विस्तृत प्रात्यक्षिके सादर झाली. सागरी क्षेत्रामधील कौशल्ये आत्मसात  करण्याव्यतिरिक्त या सरावाने आंतरकार्यक्षमता वाढवली आणि या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय आणि आसियान देशांच्या नौदलाची एकात्मिक शक्ती म्हणून कार्य करण्याची क्षमता प्रदर्शित केली.

 

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1922877) आगंतुक पटल : 396
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil