विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञानाधारित प्रशासन हे मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
09 MAY 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
तंत्रज्ञानाधारित प्रशासन हे मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मध्यावधी करिअर प्रशिक्षण कार्यक्रमाला संबोधित करताना सिंह म्हणाले की, हे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘कमाल प्रशासन, किमान शासन’ हा मंत्र दिला आणि तो साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरावर सातत्याने भर दिला.
त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल अधिक आत्मविश्वास निर्माण करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, मिशन कर्मयोगी आणि iGOT प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून त्याद्वारे कोणताही अधिकारी नवीन कार्यभार स्वीकारल्यावर, त्या नवीन जबाबदारीसाठी स्वतःमध्ये अंतर्निहित क्षमता निर्माण करू शकेल. याशिवाय, तुम्ही संबंधित संवर्गात जाण्यापूर्वी सहाय्यक सचिव म्हणून 3 महिन्यांचा कार्यकाळ प्रथमच सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम जाणून घेण्याची आणि मार्गदर्शक घडवण्याची संधी आहे, असे ते म्हणाले.
समारोप करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, आता येत्या 25 वर्षांत तंत्रज्ञान आणि मानवी सन्मुखता यांच्यात इष्टतम संतुलन कसे साधायचे आणि उत्तम परिणाम मिळविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता या दोन्हीची योग्य ती सांगड घालून इष्टतम समतोल कसा साधायचा हे आव्हान असेल.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922774)
Visitor Counter : 102