इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

राष्ट्रीय ई-शासन विभागाकडून सायबर सुरक्षित भारत अंतर्गत 36व्या विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 08 MAY 2023 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2023

राष्ट्रीय ई-शासन विभागाने क्षमतावृद्धी योजनेंतर्गत 8 मे ते 12 मे 2023 या कालावधीत नवी दिल्लीत भारतीय लोक प्रशासन संस्थेमध्ये 36 व्या सिस्को (CISO) म्हणजे मुख्य माहिती सुरक्षा  अधिकाऱ्यांसाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये  प्रमुख मंत्रालयातील तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मिळून 24 जण सहभागी आहेत.

केंद्र तसेच राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश, किंवा त्यांच्या अख्यत्यारीतील संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रमसार्वजनिक क्षेत्रीय बँका तसेच विमा कंपन्या यांच्या  नियुक्त मुख्य माहिती सुरक्षा  अधिकाऱ्यांसाठी , पोलिस तसेच संरक्षण दलातील तंत्रज्ञानाची बाजू सांभाळणाऱ्या तसेच माहिती तंत्रज्ञान व्यवस्था प्रणालींची सायबर सुरक्षेची जबाबदारी घेणारे अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी आहेत.

सायबर सुरक्षित भारत ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  (MeitY) मंत्रालयाचा उपक्रम आहे.   सायबर गुन्ह्यांबद्द्ल जागरुकता निर्माण करणे आणि  सरकारच्या प्रत्येक विभागातील मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी व आघाडीचे  माहिती तंत्रज्ञान अधिकारी यांच्या क्षमता वाढवणे आणि त्या माध्यमातून वाढत्या सायबर धोक्यांशी दोन हात करण्यासाठी त्यांना तयार करणे ही सायबर  सुरक्षित भारत उपक्रमाची  उद्दिष्टे आहेत. संस्थांनी त्यांच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे  रक्षण करणे आणि भविष्यातील सायबर हल्ल्यांशी दोन हात करायला  सुसज्ज असणे या आवश्यक बाबी आहेत .

मुख्य माहिती अधिकाऱ्यांना सायबर हल्ल्यांची सर्वसमावेशक आणि सखोल माहिती असणे, संरक्षणाची आधुनिक तंत्रे माहिती असणे आणि त्यांनी संस्था तसेच नागरिकांना लवचिक ई-मुलभूत सुविधांचे लाभ लक्षात आणून देण्याची जबाबदारी निभावणे यासाठी त्यांनी तयार करणे हे या सखोल प्रशिक्षणाचे उद्देश आहेत.  यासाठीच्या कायदेशीर तरतुदींचा सर्वसमावेशक दृष्टीकोन माहित असणे यासोबतच सायबर संकटाला तोंड देण्यासाठी यथायोग्य योजना आखणी करणे यावरही प्रशिक्षणाचा भर असेल. 

 

S.Kakade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922598) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu