संसदीय कामकाज मंत्रालय
जवाहर नवोदय विद्यालयांसाठी आयोजित 24 व्या राष्ट्रीय संसद स्पर्धा 2022-23च्या पारितोषिक वितरण समारंभाचे संसदीय कार्य मंत्रालयाकडून आयोजन
Posted On:
04 MAY 2023 8:35PM by PIB Mumbai
जवाहर नवोदय विद्यालयांसाठी 24 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23 चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी 4 मे, 2023 रोजी संसद भवन संकुल, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. 24 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23 मध्ये पश्चिम बंगालमधील (पटना क्षेत्र) नादिया येथील जवाहर नवोदय विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
केंद्रीय संसदीय कार्य आणि संस्कृती मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थी आणि विद्यालयांच्या विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान केली, जवाहर नवोदय विद्यालय, चंद्रपूर, महाराष्ट्र (पुणे) यासह आपापल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या 7 विद्यालयांचाही पारितोषिक विजेत्यांमध्ये समावेश होता.
मेघवाल यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तरुण पिढीने लोकशाहीची लोकशाही मूल्ये आणि नीतितत्त्वे शिकून ती अवलंबली पाहिजेत आणि या लोकशाही देशाचे सौहार्द आणि परंपरा वाढवण्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे मेघवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मेघवाल यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञाही दिली.
संसदीय कामकाजाच्या पद्धती आणि प्रक्रिया सर्वदूर पोहोचवण्याचे आणि स्वतःमध्ये रुजवण्याचे आवाहन, संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव जी. श्रीनिवास यांनी स्वागतपर भाषण करताना केले. राष्ट्रीय संसद स्पर्धा शाळांपासून विद्यापीठापर्यंत घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922076)
Visitor Counter : 162