ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशच्या ऊर्जा प्रकल्पामधील जोडणीसह एनटीपीसीने आपली परदेशातील पहिली ऊर्जा क्षमता केली स्थापित ; समूहाची स्थापित क्षमता 72304 मेगावॅट पर्यंत पोहोचणार

Posted On: 03 MAY 2023 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2023

एनटीपीसी म्हणजेच राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने बांगलादेशपासून सुरुवात करून, परदेशात प्रथमच ऊर्जा क्षमता स्थापित केली आहे. समूहाने  अलीकडेच बांगलादेशातील रामपाल, मोंगला, बागेरहाट येथे असलेल्या 1320 मेगावॅट (2x660) मैत्री सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये  (एमएसटीपीपी ) 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट -1 जोडले आहे. या नव्या जोडणीमुळे एनटीपीसीची स्थापित क्षमता 72304 मेगावॅटवर पोहोचणार आहे.

हा उपक्रम  कंपनीची जागतिक पोहोच तसेच  विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा प्रदान करण्याची वचनबद्धता दर्शवतो .हा प्रकल्प  एनटीपीसी लिमिटेडची परदेशी संयुक्त उपक्रम  कंपनी  असलेल्या  बांगलादेश-इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या  (बीआयएफपीसीएल )  सहकार्याने कार्यान्वित करण्यात आला.

आवश्यक निकष आणि मान्यता प्राप्त केल्यानंतर, एमएसटीपीपी च्या युनिट 1 चा समावेश एनटीपीसी  समूहाच्या स्थापित आणि व्यावसायिक क्षमतेमध्ये   करण्यात आला .  या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता एनटीपीसीने हाती घेतलेल्या प्रत्येक प्रकल्पातील नावीन्य आणि उत्कृष्टतेची वचनबद्धता अधोरेखित करते.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921820) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu , Hindi