ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चिंतन शिबिरांमधून समोर येतो नाविन्यपूर्ण कल्पनांचा मुक्त प्रवाह : पीयूष गोयल


फरिदाबाद येथे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागातर्फे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

सार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करणे आणि अन्न सुरक्षा यावर प्राधान्याने चर्चा

Posted On: 03 MAY 2023 9:43AM by PIB Mumbai

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि  सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी,फरिदाबाद येथे आयोजित  चिंतन शिबिरात अन्न आणि  सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद  साधला. आणि ही चिंतन शिबीरे सातत्याने आयोजित करण्यात यावी अशा सूचना गोयल यांनी दिल्या. अशा प्रकारची शिबीरे  संवादाच्या दृष्टीने पदश्रेणीमधील  अडथळे दूर करतात आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा मुक्त प्रवाह या शिबिरांमधून पाहायला मिळतो. शिबिरांमध्ये मांडण्यात आलेल्या  कल्पनांच्या आधारे   मोठ्या लोकसंख्येच्या फायद्यासाठी विभागाद्वारे आगामी  प्रक्रिया केली जाऊ शकते आणि सर्वांच्या व्यक्तिगत विकासासाठी चिंतन शिबीरे एक व्यासपीठ देखील प्रदान करतात असे गोयल म्हणाले.

फरिदाबाद येथे  27 ते  28 एप्रिल 2023 या कालावधीत  हे  दोन दिवसीय चिंतन शिबिर झाले.

या शिबीराच्या उद्घाटन सत्रादरम्यान उपस्थित, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राम  विकास राज्यमंत्री, साध्वी निरंजन ज्योती यांनी, विभागाच्या कार्याचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने, या शिबीरात उपस्थितांनी नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल सहभागींची प्रशंसा केली. शिबिरातून  समोर आलेल्या कल्पना कृतीत आणण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले   आणि आपल्या विभागाचा  अन्न सुरक्षेचा  दृष्टीकोन सुनिश्चित करण्यासाठी या कल्पना  जास्तीत जास्त व्यवहारात आणण्याचा सल्ला त्यांनी  दिला.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा  यांच्यासह विभागातील जवळपास 100 अधिकारी/कार्यालयीन अधिकारी या शिबिरात सहभागी झाले होते. याशिवाय या विषयातील तज्ज्ञ प्रख्यात  आर.एस.सोधी,  अशोक गुलाटी आणि एस शिवकुमार यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या  दृष्टिकोनाची  पूर्तता कशी करावी याबद्दल त्यांच्या कल्पना मांडल्या.

आर.एस.सोधी यांनी अमूलसोबतचा त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव सामायिक  केला आणि एक कार्यक्षम पुरवठा साखळी तयार करण्याबाबत सखोल माहिती दिली. प्राध्यापक  अशोक गुलाटी यांनी पोषण सुरक्षा आणि हवामान अनुकूलतेसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा  फायदा घेण्याबाबत आपले मत व्यक्त केले.  कृषी व्यवसायावरील त्यांच्या सूक्ष्म  ज्ञानाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेची ग्राहककेंद्रीता वाढवण्याबाबत एस. शिवकुमार यांनी आपला दृष्टिकोन मांडला. नामवंत  प्रेरक वक्ते शिव खेरा यांनी या  शिबिरात, जीवनात बदल घडवणाऱ्या  रंजक चर्चेसह शिबिरात सहभागी झालेल्यांचा उत्साह वाढवला.

****

Mahesh C/Sonal C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921578) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu