ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी आणि एनपीसीआयएल यांच्यात संयुक्तपणे अणुऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी सामजस्य करार
ही संयुक्त उपक्रम कंपनी 2x700 मेगावॉट क्षमतेचा चुटका मध्य प्रदेश अणुऊर्जा प्रकल्प आणि 4*700 मेगावॉट क्षमतेचा माही बंसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प यांची उभारणी करणार
Posted On:
01 MAY 2023 6:21PM by PIB Mumbai
एनटीपीसी या सार्वजनिक क्षेत्रातील वीजनिर्मिती कंपनीने देशात अणुऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी एनपीसीआयएल अर्थात भारतीय अणुऊर्जा महामंडळ या कंपनीशी आज नवी दिल्ली येथे संयुक्त उपक्रमविषयक पुरवणी करार केला.
सुरुवातीला, ही संयुक्त उपक्रम कंपनी 2x700 मेगावॉट क्षमतेचा चुटका मध्य प्रदेश अणुऊर्जा प्रकल्प आणि 4x700 मेगावॉट क्षमतेचा माही बंसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प या दोन प्रेशराईज्ड हेवी वॉटर अणुभट्टी प्रकल्पांची उभारणी करणार आहे. हे दोन प्रकल्प देशातील समूह पद्धतीने विकसित अणुऊर्जा प्रकल्प विकसन कार्याचा भाग आहेत.
हा संयुक्त उपक्रमविषयक पुरवणी करार म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प उभारणी क्षेत्रात एनटीपीसी आणि एनपीसीएल यांच्यातील सहयोगी संबंध आणि परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून हा करार देशाला वर्ष 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वच्छ उर्जा विषयक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921279)
Visitor Counter : 198