अंतराळ विभाग

प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून विकसित केलेल्या कमी किमतीच्या नवीन स्टार सेन्सरची पहिली प्रक्षेपण चाचणी यशस्वी

Posted On: 01 MAY 2023 5:02PM by PIB Mumbai

 

खगोलशास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून विकसित केलेला कमी किमतीचा एक नवीन स्टार सेन्सर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अलीकडेच पीएसएलव्ही C-55 या प्रक्षेपकावर बसवला. पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (पीओईएम) वर बसवलेले सेन्सर त्याच्या पहिल्याच अंतराळ चाचणीत उत्तम कामगिरी करत असून प्रारंभिक डेटाने आता त्याची रचना तसेच त्याचे कार्य प्रमाणित केले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (DST) स्वायत्त संस्था असलेल्या, भारतीय खगोल भौतिकी संस्था (IIA) ने, विकसित केलेला स्टार बेरी सेन्स पेलोड 22 एप्रिल रोजी प्रक्षेपित करण्यात आलाउपग्रह नेमका कोणत्या दिशेला निर्देश करत आहे याची त्वरित गणना करण्यासाठी रचना केलेल्या या नवीन आणि कमी किमतीच्या सेन्सरची अवकाशात पहिल्यांदाच चाचणी घेतली जात आहे. स्टारबेरीसेन्सने अंतराळातील कठोर परिस्थितीचा सामना केला असून अपेक्षेप्रमाणे कार्य केले आहे, आणि इतकेच नव्हे तर सुरुवातीच्या डेटावरून असे दिसून येते की हे तो निर्देशित दिशेची मोजणी करण्यात सक्षम आहे, असे स्पेस पेलोड्स ग्रुपच्या खगोलशास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे.

कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी, एखाद्या विशिष्ट वेळी उपग्रह नेमका कोणत्या दिशेला तोंड करून आहे हे जाणून घेणे महत्वाचे असते. असे करण्यासाठी निरनिराळ्या पद्धती उपलब्ध असल्या तरी स्टार सेन्सर अंतराळयानाच्या विशिष्ट दिशेला असलेल्या स्थानाबद्दल सर्वात अचूक माहिती प्रदान करतो. IIA मधील स्पेस पेलोड्स ग्रुपने डिझाइन केलेला स्टार्ट सेन्सर त्याच्या दृष्टिक्षेपात असणारे तारे ओळखून त्यानुसार अंतराळात त्याचे तोंड कोणत्या दिशेला हवे ते शोधण्यात सक्षम आहे."हे पेलोड सुप्रसिद्ध मिनी कॉम्प्युटर रास्पबेरीपायच्या अनुषंगाने तयार केले गेले आहे, आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर यांची रचना संस्थेमध्येच केली आहे," असे IIA मधील प्रकल्पाचे तंत्रज्ञान प्रमुख आणि पी एच डी चे विद्यार्थी भारत चंद्र म्हणाले. या पेलोडचा फायदा असा आहे की ते किफायतशीर आहे, तयार करण्यास सोपे आणि विविध प्रकारच्या उपग्रहांवर बसवता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

स्टारबेरीसेन्स इस्रोच्या पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (POEM) वर बसवण्यात आले होते, जे आमच्या पेलोडचे परिचालन करण्यासाठी एक स्थिर प्लॅटफॉर्म प्रदान करते. POEM हा इस्रोचा एक अनोखा उपक्रम असून पीएसएलव्ही या प्रक्षेपकामध्ये असलेल्या चौथ्या टप्प्याचा प्रक्षेपणकार्यातील वापर पूर्ण झाल्यावर त्याचा वैज्ञानिक प्रयोगांसाठी ऑर्बिटल प्लॅटफॉर्म म्हणून वापर केला जातो. अंतराळात अल्पकालीन वैज्ञानिक प्रयोग करण्याची ही एक उत्तम संधी आहे, असे स्टारबेरीसेन्स प्रकल्पाचे प्रमुख संशोधक रेखेश मोहन म्हणाले.



The team members of the Space Payload Group at Indian Institute of Astrophysics with the engineering model of StarBerrySense.

 

A sample image from StarBerrySense. The image is inverted and hence stars appear black against a white background. The red circles mark the positions of stars that were compared with external databases.

***

S.Patil/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921210) Visitor Counter : 181