नागरी उड्डाण मंत्रालय
मन की बात च्या 100 व्या भागाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी नवी दिल्लीच्या जे आय एम एस चे विद्यार्थी आणि प्राध्यापकवृंदासह घेतला आनंद
Posted On:
30 APR 2023 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2023
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री, ज्योतिरादित्य सिंदिया यांनी नवी दिल्ली येथील कालकाजीच्या जगन्नाथ इंटरनॅशनल मॅनेजमेंट स्कूल (जे आय एम एस) चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह आज "मन की बात" कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचा आनंद घेतला.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत, मन की बात हा लोकांचा कार्यक्रम बनला आहे आणि संस्कृती, विविधता तसेच संवादाला प्रोत्साहन देऊन राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की हा कार्यक्रम लोकशाही जोपासणारा असून या कार्यक्रमामुळे नागरिकांना प्रत्येक महिन्यात पंतप्रधानांशी थेट संपर्क साधता येतो. कोट्यवधी भारतीयांना देशाच्या विकासयात्रेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत, पंतप्रधानांनी हा कार्यक्रम म्हणजे एक मासिक राष्ट्रीय परंपरा केल्याचे सिंदिया यांनी यावेळी सांगितले.
मन की बात हा कार्यक्रम, नागरिकांचे आचार, विचार, आणि मनोव्यापारावर सकारात्मक प्रभाव टाकतो. 60 टक्के श्रोत्यांनी राष्ट्र उभारणीत सकारात्मक योगदान देण्यात स्वारस्य दाखवले आहे.
* * *
N.Chitale/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920988)
Visitor Counter : 128