श्रम आणि रोजगार मंत्रालय
औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक खरेदी क्षमतेवर आधारित चलनफुगवट्याचा दर (2016=100) – मार्च, 2023
प्रविष्टि तिथि:
29 APR 2023 4:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2023
मार्च 2023 साठी अखिल भारतीय औद्योगिक कामगार ग्राहक खरेदी क्षमतेवर आधारित चलन फुगवट्याचा दर 0.6 अंकांनी वाढला आणि 133.3 (एकशे तेहतीस पूर्णांक तीन दशांश ) इतका झाला आहे. एका महिन्यातील टक्केवारीतील बदलानुसार, मागील महिन्याच्या तुलनेत हा दर 0.45 टक्क्यांनी वाढला आहे, जो एका वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये नोंदवलेल्या दराच्या तुलनेत, 0.80 टक्क्यांनी अधिक आहे.
चलनफुगवट्यात झालेली वाढ प्रामुख्याने इंधन आणि वीज दरात झालेल्या वाढीमुळे असून, या दोन्ही वस्तूंच्या दरात, पाव टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
इतर वस्तूंच्या बाबतीत, स्वयंपाकाचा गॅस/एलपीजी, जळावू लाकूड आणि चिप्स, रुग्णालये/नर्सिंग होम शुल्क, अॅलोपॅथिक औषधे, मोटर सायकल/स्कूटर मोपॅड, साबण, टूथपेस्ट, तूरडाळ, गाईचे दूध, डेअरीचे दूध, ताजे मासे, शुद्ध तूप, सफरचंद, केळी, फुलकोबी, वांगी, कोबी, कारले, चवळी, लिंबू, मटार, जिरे, तयार खाद्यपदार्थ, अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
मात्र, गव्हाचे पीठ, तांदूळ, बटाटा, कांदा, शेवग्याच्या शेंगा, भेंडी, टोमॅटो, द्राक्षे, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, सरकीचे तेल, पोल्ट्री चिकन, अंडी-कोंबडी या वस्तूंचे दर कमी झाले आहेत.
गेल्या महिन्यातील 6.16 टक्क्यांच्या तुलनेत या महिन्यात (मार्च) वार्षिक तुलनात्मक चलनवाढीचा दर 5.79 टक्के होता. तर, गेल्यावर्षी याच कालावधीत हा दर 5.35 टक्के होता. त्याचप्रमाणे, अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 6.13 टक्के आणि या (मार्च महिन्यात) 5.02 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.27 टक्के इतका होता.
Y-o-Y Inflation based on CPI-IW (Food and General)

All-India Group-wise CPI-IW for February, 2023 and March, 2023
|
Sr. No.
|
Groups
|
February, 2023
|
March, 2023
|
|
I
|
Food & Beverages
|
131.5
|
131.7
|
|
II
|
Pan, Supari, Tobacco & Intoxicants
|
152.2
|
153.8
|
|
III
|
Clothing & Footwear
|
133.0
|
133.3
|
|
IV
|
Housing
|
123.4
|
123.4
|
|
V
|
Fuel & Light
|
177.8
|
182.2
|
|
VI
|
Miscellaneous
|
130.4
|
131.1
|
|
|
General Index
|
132.7
|
133.3
|
CPI-IW: Groups Indices

* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920760)
आगंतुक पटल : 244