शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्किलिंग, अपस्किलिंग आणि रीस्किलिंगच्या दृष्टीकोनातून शिकणाऱ्यांची अधिक प्रगती सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेसह भारताच्या जी20 अध्यक्षतेखालच्या शैक्षणिक कार्य गटाची तिसरी बैठक आज भुवनेश्वर येथे संपन्न

Posted On: 28 APR 2023 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2023 

 

G20 च्या भारताच्या अध्यक्षपदाखाली   3 ऱ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीचा आज भुवनेश्वर येथे स्किलिंग, अपस्किलिंग आणि रीस्किलिंगच्या  दृष्टीकोनातून    शिकणाऱ्यांची धिक  प्रगती  सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेसह समारोप झाला. 26 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित 3 दिवसीय चर्चासत्र आणि सभेत  ‘क्षमता उभारणी  , कामाच्या भविष्याच्या संदर्भात आजीवन शिक्षणाला चालना देणे’ या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आली.

उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती,  शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव संजय कुमार आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव अतुल कुमार तिवारी आणि मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. युनिसेफ,संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना यासह G20 गटाचे सदस्य, आमंत्रित आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह 27 देशांतील 60 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली.  21 व्या शतकात यशस्वी होण्यासाठी ज्ञान, क्षमता, कौशल्ये आणि अभिवृत्तीने लोक सुसज्ज आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांनी शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करण्याचे महत्त्व सांगितले.

ही  बैठक जी 20 बद्दल जागरुकता वाढवण्यात यशस्वी झाली.  उत्कल दिवसापासून 22 एप्रिलपर्यंत विविध जनभागीदारी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.  राज्यभरात अनेक अभिरुप जी 20 बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये 590 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.  सुमारे 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी सुमारे 1,235 जन भागीदारी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि भारताचे जी 20  अध्यक्षपद खऱ्या अर्थाने जनतेचे अध्यक्षपद झाले.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920667) Visitor Counter : 186


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia