विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित अर्थव्यवस्थेत भारताचा जागतिक वावर वाढत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
28 APR 2023 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2023
केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री; डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लंडन येथे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित अर्थव्यवस्थेत भारताचा जागतिक वावर वाढत आहे.
डॉ जितेंद्र सिंह ब्रिटनच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर असून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. या दौऱ्या दरम्यान मंत्र्यांनी सरे विद्यापीठाला भेट दिली आणि सेमीकंडक्टर सुविधेची पाहणी केली.
सुविधेला भेट देण्याच्या निमंत्रणासाठी विद्यापीठाचे आभार मानताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीत झपाट्याने महत्त्वाचा सहभागी बनत आहे आणि ब्रिटनमधील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी सहयोग करण्यास सज्ज आहे.
इंग्लंडच्या सरे येथील गिल्डफोर्ड शहरातील सरे विद्यापीठ हे सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. मंत्र्यांनी नमूद केले की भारत सेमीकंडक्टर कार्यक्रम आणि मुख्य पुरवठा साखळींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी ते संभाव्य सहयोगी ठरू शकते. ते पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून पुढे जाण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग (ईएसडीएम) साठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले परिसंस्थेच्या विकासासाठी 76,000 कोटी (> 10 अब्ज अमेरिकी डॉलर) रुपयांचा व्यय असलेला एक व्यापक कार्यक्रम मंजूर केला आहे. सेमीकंडक्टर्स, डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाइन परिसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीत भारताच्या वाढत्या उपस्थितीचा मार्ग मोकळा होईल, असे ते म्हणाले.
सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग तसेच डिझाइनमधील कंपन्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रोत्साहन पॅकेज प्रदान करून हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात नवीन युगाची सुरुवात करेल.
सेमीकंडक्टर कार्यक्रम आणि मुख्य पुरवठा साखळींमध्ये भारत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे, सरे विद्यापीठ या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी संभाव्य सहयोगी ठरू शकते, असे सांगत मंत्र्यांनी समारोप केला.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920642)
Visitor Counter : 127