नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी हवाई वाहतूक सुरक्षा ब्यूरोचा 37 वा स्थापना दिवस
Posted On:
27 APR 2023 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2023
नागरी विमान वाहतूक सुरक्षेकरिता राष्ट्रीय नियामक म्हणून काम पाहणाऱ्या ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (BCAS-नागरी हवाई वाहतूक सुरक्षा ब्यूरो) आज नवी दिल्ली येथे आपला 37 वा स्थापना दिवस साजरा केला. दोन दिवसीय कार्यक्रमाच्या आजच्या उद्घाटन सत्रात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ.व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तपासनीसांना पुरस्कार प्रदान केले. वर्ष 2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि प्रजासत्ताक दिन 2023 निमित्त उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आलेल्या बीसीएएसच्या अधिकाऱ्यांनाही सिंग यांनी पुरस्कार प्रदान केले.

सिंग यांनी यावेळी कार्यक्रमातील उद्घाटन सत्राला संबोधित केले. विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा ही एक महत्त्वाची बाब आहे आणि विमान उड्डाण कार्यान्वयन सुखरूप आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे यावर त्यांनी भर दिला.
“बीसीएएस विमान प्रवाशांना, सुरक्षेची एक मोठी हमी देते, नवीन तंत्रज्ञानामुळे उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संबंधितांनी कठोर मानक कार्यपद्धती अवलंबणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरी विमान उड्डाणांच्या संदर्भात सुरक्षिततेसाठी मानके निश्चित करणे तसेच नियमित तपासणी आणि सुरक्षा लेखाद्वारे त्याचे पालन सुनिश्चित करण्याचे काम बीसीएएस करते.
* * *
S.Kakade/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1920282)
Visitor Counter : 163