संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या यजमानपदात 28 एप्रिल रोजी शांघाय सहकार्य संघटने मधील देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक

Posted On: 25 APR 2023 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023

शांघाय सहकार्य संघटनेचा (एससीओ) वर्ष 2023 मधील अध्यक्ष या नात्याने भारताच्या यजमानपदात येत्या 28एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे एससीओ सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. आंतरसरकारी संघटना म्हणून वर्ष 2001 मध्ये एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली. एससीओ मध्ये भारतासह कझाकस्तान, चीन, किर्गीझीस्तान, पाकिस्तान,रशिया,ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा सहभाग आहे. सदस्य देशांशिवाय, या संघटनेत बेलारूस आणि इराण हे दोन निरीक्षक देश देखील 28एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या एससीओ संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

या बैठकीमध्ये उपस्थित संरक्षणमंत्री इतर अनेक विषयांसह प्रादेशिक शांतता आणि सुरक्षितता यांच्याविषयी चिंता वाढविणाऱ्या समस्या, एससीओमधील दहशतवाद प्रतिबंधक प्रयत्न आणि परिणामकारक  बहुपक्षीय कार्य यावर चर्चा करतील.

‘सुरक्षित-एससीओ’ ही भारताच्या 2023 मधील अध्यक्षपदाची संकल्पना आहे. बहुपक्षीय,राजकीय,सुरक्षाविषयक,आर्थिक बाबी आणि  या प्रदेशातील नागरिकांमधील परस्पर संवाद यांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात भारताने एससीओला विशेष महत्त्व दिले आहे. एससीओसोबतच्या विद्यमान सहभागाने भारताला  या प्रदेशातील ज्या  देशांशी नागरी संबंध आहेत आणि ज्यांना भारताचे विस्तारित शेजारी म्हणता येईल अशा देशांशी असलेल्या संबंधांना अधिक प्रोत्साहन देण्यात मदत झाली आहे.

एससीओ ही संघटना सदस्य देशांचे सार्वभौमत्व तसेच प्रादेशिक अखंडता, परस्परांच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप न करणे, सर्व सदस्य देशांना समान दर्जा तसेच परस्पर समन्वय आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे या  तत्वांवर आधारित धोरणे राबविते.

एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या या बैठकीच्या काळातच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बैठकीत उपस्थित असलेल्या इतर संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919631) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi