आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 25 APR 2023 10:58AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220 कोटी 66 लाख लसींच्या एकूण `मात्रा (95 कोटी 21 लाख दुसरी मात्रा आणि 22 कोटी 87 लाख वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 4,943 लसींच्या मात्रा दिल्या गेल्या.

भारतात सद्यस्थितीत कोविड बाधितांची अद्ययावत आकडेवारी 63,380 एवढी आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 0.14% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर 98.67% आहे

गेल्या 24 तासात 9,213 रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,43,11,078 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 6,660 नवीन बाधितांची नोंद झाली

दैनंदिन बाधित होण्याचा दर (3.52%) आहे

साप्ताहिक बाधित होण्याचा दर (5.42%)आहे

आतापर्यंत 92 कोटी 56 लाख एकूण चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 1,89,087 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Thakur/S.Patgaonkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919398) Visitor Counter : 114