अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारने सरकारी रोखे (i) 7.17% GS 2030', (ii) '7.41% GS 2036' आणि (iii) '7.40% GS 2062' च्या विक्रीसाठी जारी (पुनर्जारी )केला लिलाव
Posted On:
24 APR 2023 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
केंद्र सरकारने (i) एकसमान किंमत पद्धत वापरून किंमत आधारित लिलावाद्वारे 7,000 कोटी रुपयांच्या (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी “7.17% सरकारी रोखे 2030” ची विक्री (पुनर्जारी ) , (ii) 12,000 कोटी (नाममात्र) रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी "7.41% सरकारी रोखे 2036" आणि (iii) 12,000 कोटी (नाममात्र) रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी “7.40% सरकारी रोखे 2062” ची विक्री करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडे वर नमूद प्रत्येक सरकारी रोखे मध्ये 2,000 कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत अतिरिक्त सब्स्क्रिप्शन कायम ठेवण्याचा पर्याय असेल. भारतीय रिजर्व बँक , मुंबई कार्यालय, फोर्ट, मुंबई द्वारे 28 एप्रिल , 2023, (शुक्रवार) रोजी हे लिलाव केले जातील.
रोख्यांच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या 5 टक्क्यांपर्यंतची रक्कम सरकारी रोख्यांच्या लिलावात बिगर-स्पर्धात्मक बोली सुविधा योजनेनुसार पात्र व्यक्ति आणि संस्थाना वितरित केली जाईल.
लिलावासाठी स्पर्धात्मक आणि बिगर-स्पर्धात्मक दोन्ही बोली भारतीय रिजर्व बँक कोर बैंकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणाली वर इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये 28 एप्रिल 2023 रोजी सादर होणे आवश्यक आहे. बिगर-स्पर्धात्मक बोली सकाळी 10:30 पासून 11:00 वाजेपर्यंत आणि स्पर्धात्मक बोली सकाळी 10:30 पासून 11:30 दरम्यान सादर व्हायला हवी.
लिलावांचे निकाल 28 एप्रिल , 2023 (शुक्रवार) रोजी घोषित केले जातील आणि यशस्वी बोलीदारांद्वारे भरणा 2 मे , 2023 (मंगलवार) रोजी केला जाईल.
हे रोखे भारतीय रिजर्व बँक द्वारा वेळोवेळी सुधारित परिपत्रक दिनांक 24 जुलै , 2018 च्या RBI/2018-19/25 अंतर्गत जारी मार्गदर्शक तत्वांनुसार “व्हेन इशू ” ट्रेडिंगसाठी पात्र असतील.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919321)