नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुधारित अंदाजानुसार पॉवर ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये 59 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली


वीज व्यापारातून प्रथमच महसूलाने ओलांडला 10,000 कोटी रुपयांचा टप्पा

भारत अभूतपूर्व वेगाने शाश्वत संसाधनांच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहे-सुमन शर्मा, व्यवस्थापकीय संचालक, भारतीय सौर ऊर्जा महामंडळ

Posted On: 24 APR 2023 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

 
भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने 35 अब्ज युनिट्सपेक्षा अधिक व्यापार केला असून मागील वर्ष 2022-2023 च्या तुलनेत नवीकरणीय ऊर्जा  व्यापारात 59 टक्क्यांनी अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच वीज व्यापार 
महसुलाने 10,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
 
या यशाबद्दल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी माहिती दिली. "भारत अभूतपूर्व वेगाने शाश्वत स्त्रोतांकडे ऊर्जा संक्रमण करत आहे. भारतीय सौर ऊर्जा महामंडळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार वर्ष 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.  महामंडळाचे कर्मचारी आणि व्यवस्थापन  या ध्येयासाठी अथक परिश्रम करत आहे."
 
भारतीय सौर ऊर्जा महामंडळ हे मिनीरत्न श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून  2011  पासून गणले गेले आहे.भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी नवीकरणीय ऊर्जा योजना/प्रकल्प राबविणारी ही नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची प्राथमिक कार्यान्वयन संस्था आहे.
 
आतापर्यंत भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने 56 गिगावॅटपेक्षा अधिक  अक्षय ऊर्जा प्रकल्प क्षमता प्रदान केली आहे. महामंडळ    स्वतःच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तसेच  प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून इतर सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसाठी  प्रकल्प उभारण्याकरिता सक्रिय आहे. आयसीआरएद्वारे भारतातील सौर ऊर्जा महामंडळाला प्रमाणन प्राधिकरण आणि लेखाचे AAA हे सर्वोच्च क्रेडिट रेटिंग देण्यात आले आहे.
 

G.Chippalkatti/S.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919297) Visitor Counter : 155


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi