भूविज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी जागतिक वसुंधरा दिन समारंभाला संबोधित केले, पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या 'लाइफ' चळवळीचा केला पुनरुच्चार
Posted On:
22 APR 2023 7:19PM by PIB Mumbai
आज दिल्ली येथे जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी भूविज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "लाइफ" (पर्यावरणासाठी जीवनशैली) चळवळीचा पुनरुच्चार केला. निसर्गाशी सुसंगत राहण्याच्या आपल्या संस्कृतीच्या अनुषंगाने शाश्वत विकासासाठी भारत कटिबद्ध आहे असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्र संघाचे राजदूत आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय संगीत संयोजक आणि पर्यावरणवादी, रिकी केज हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते.त्यांच्या ‘पृथ्वी आणि पर्यावरण’ या विषयावरील नवीन संगीत रचनेचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2022 मध्ये 'पर्यावरणासाठी जीवनशैली (लाइफ) चळवळ सुरू केल्याची आठवण करून देत डॉ जितेंद्र सिंह यांनी मानव-केंद्रित, सामूहिक प्रयत्न आणि शाश्वत विकासासाठी ठोस कृतीद्वारे आपल्या ग्रहासमोरील आव्हान सोडवणे ही काळाची गरज आहे यावर भर दिला.
वसुंधरा दिन हा 22 एप्रिल रोजी पर्यावरण संरक्षणाप्रति समर्थन प्रदर्शित करण्यासाठी साजरा केला जातो.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पृथ्वी विज्ञान मंत्रालय हवामान, वातावरण, महासागर, किनारपट्टी, जलविज्ञान आणि भूकंपशास्त्रीय सेवा प्रदान करण्यासाठी पृथ्वी प्रणाली विज्ञानाशी संबंधित सर्व पैलूंवर संपूर्ण लक्ष देऊन कार्य करते.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918829)
Visitor Counter : 153