सांस्कृतिक मंत्रालय
दोन दिवसीय जागतिक बौद्ध शिखर परिषद 2023 चा नवी दिल्ली जाहीरनाम्यासह झाला समारोप
Posted On:
21 APR 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जागतिक बौद्ध शिखर परिषदेचा आज नवी दिल्ली जाहीरनाम्यासह समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 एप्रिल 2023 रोजी या शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधानांनी अधोरेखित केलेल्या मुद्यांना या जाहीरनाम्यामध्ये बळकटी देण्यात आली. सार्वत्रिक मूल्यांचा प्रसार आणि त्यांचा अंगिकार करण्याच्या पद्धती, एकत्र काम करण्याचे मार्ग, सध्याच्या काळात जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगे आणि जगाच्या भविष्यासाठी एक शाश्वत आदर्श प्रदान करणे यावर या परिषदेत भर देण्यात आला.
सार्वत्रिक शांततेसाठी भगवान बुद्धांच्या शांततेच्या, कल्याणाच्या, सुसंवादाच्या आणि करुणेच्या संदेशाला अनुसरून प्रेरणा आणि मार्गदर्शन देणाऱ्या मूलभूत गोष्टींवर भर देण्याबाबत या परिषदेत सहमती व्यक्त करण्यात आली.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918657)
Visitor Counter : 211