आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा अन्न सुरक्षा आणि अनुपालन प्रणाली वेब अर्ज प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार
1.2 कोटी खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांना होणार फायदा
Posted On:
21 APR 2023 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023
खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांद्वारे (एफबीओ ) परवाने मिळवण्यासाठी /नोंदणी करण्याच्या अनुषंगाने व्यवसाय सुलभतेला पाठबळ देण्याचा प्रयत्न म्हणून, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने त्यांचा अन्न सुरक्षा आणि अनुपालन प्रणाली वेब अर्ज (एफओएससीओएस ) हिंदीमध्ये भाषांतर करण्याचे काम हाती घेतले असून त्यानंतर सर्व प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहे.परवान्यांसाठी अर्ज करताना सर्व नवीन खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांना वापर सुलभतेला पाठबळ या अद्ययावत उपायाने आश्वस्त केले आहे. परिणामी 1.2 कोटींहून अधिक खाद्य व्यवसाय परिचालकांनी परवाना नूतनीकरणासाठी नोंदणी केली आहे.
अन्न सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या आणि पोहोच व्यापक करण्याच्या उद्देशाने,भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अर्जामध्ये अनेक वापरकर्ता-स्नेही वैशिष्ट्ये सुरू केली आहेत, याची पहिली पायरी , परवाना आणि नोंदणीसाठी हा अर्ज इतर सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देणे ही आहे. यामुळे खाद्य पदार्थांचा व्यवसाय आणि महसूल वाढेल, पोहोचण्याची क्षमता वाढेल आणि जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल.
अन्न सुरक्षा आणि अनुपालन प्रणाली अर्जाची हिंदी आणि सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्धता देखील खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांना अन्न सुरक्षा अनुपालन प्रणालीची अधिक चांगली माहिती मिळवून देण्यासाठी मदत करेल.हिंदी आणि सर्व प्रादेशिक भाषांमध्ये या प्रणालीच्या उपलब्धतेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांचा सहभाग वाढेल.
अन्न सुरक्षा आणि अनुपालन प्रणाली ही खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांच्या नोंदणीसाठी आणि परवाना देण्यासाठी एक व्यापक प्रणाली आहे. सर्व प्रकारच्या अनुपालनांसाठी अन्न सुरक्षा नियामकासह त्यांच्या इंटरफेसची सुविधा या एकाच प्रणालीद्वारे खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांना उपलब्ध होत आहे.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918614)
Visitor Counter : 196